पिचड आदिवासी मंत्री असतानाच सर्वाधिक घुसखोरी झाली ः आ.डॉ.लहामटे आंदोलनानंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना दिले जोरदार प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, अकोले
आमदार असताना घुसखोरी रोखण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत हा आरोप धादांत खोटा आहे. उलट मधुकर पिचड आदिवासी मंत्री असताना सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. दस्तुरखुद्द पिचडांच्या घरातच घुसखोरी झाल्याचा घणाघाती आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

अखिल भारतीय अदिवासी विकास परिषदेने सोमवारी (ता.21) आमदार लहामटे यांच्या घरावर काळे झेंडे लावून आंदोलन केले होते. यावेळी पळकुटे आमदार अशी टीका करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना आमदार लहामटे म्हणाले, मी पळकुट्याची औलाद नाही. आंदोलनकर्त्यांनी मला पुटसशी कल्पना देखील दिली नव्हती. मी महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईला गेलो होतो. तर आमदार असताना घुसखोरी रोखण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत हा आरोप धादांत खोटा आहे. उलट मधुकर पिचड आदिवासी मंत्री असताना सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. दस्तुरखुद्द पिचडांच्या घरातच घुसखोरी झाल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

तसेच अगस्ति कारखान्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत संचालक व समन्वय समितीची बैठक झाली असून कारखान्याला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देताना त्यांनी कारभार काटकसरीने करण्याचा सल्ला दिला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात त्यांनी अधिकार्‍यांशी संपर्क साधून लवकरच बैठक घेऊन हा मार्ग पूर्ववत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा मार्ग बदलल्याची सूतराम कल्पना त्यांना नव्हती. पावसाळी अधिवेशनापूर्वी उपजिल्हा रुग्णालय मंजूर होणार असून समशेरपूर, राजूर, कोतूळ व बोटा येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर कार्यान्वित होईल. याचबरोबर कोतूळ पूल 2022 पर्यंत आणि पिंपरकणे 2024 पर्यंत कार्यान्वित होईल. देवीचा घाट रस्त्यासाठी 4.50 कोटी वर्ग झाले असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल आणि घाटघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही लवकरच सुटेल असे त्यांनी सांगितले.

Visits: 2 Today: 1 Total: 27263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *