कौठे धांदरफळ सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
कौठे धांदरफळ सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आला आहे. यामध्ये दूध वगळता सर्व अत्यावश्यक सेवाही बंद राहणार आहेत.

गाव बंद काळात सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई आहे. तसेच पितृपक्षामुळे संभाव्य गर्दी टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान विनाकारण आणि विना मास्क अथवा रुमाल फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतने दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखा असे आवाहन सरपंच इंदुताई घुले, उपसरपंच गणेश घुले, ग्रामविकास अधिकारी गोकुळ वर्पे, पोलीस पाटील चंद्रभान वलवे यांनी केले आहे.

Visits: 88 Today: 1 Total: 1108019
