‘पोखरकर नेत्रालया’चा दिमाखात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात समृद्ध वैद्यकीय सेवा म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरात अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेल्या ‘पोखरकर नेत्रालया’चा नुकताच जुने तांबे हॉस्पिटल समोर मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला आहे.

विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते फीत कापून रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, विवेक कासार, मदनलाल कारवा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. डी. एल. शेळके, डॉ. सोमनाथ मुटकुळे, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक वायकर, नगरसेवक नितीन अभंग, डॉ. किशोर पोखरकर, आशा पोखरकर, डॉ. संतोष पोखरकर, डॉ. प्राजक्ता पोखरकर, अ‍ॅड. दिलीप पोखरकर, विलास पोखरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नेत्रविकारांतील उच्च शिक्षण घेऊन डॉ. संतोष पोखरकर यांनी गोरगरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेवा-सुविधा देण्यासाठी संगमनेरात रुग्णालय उभारुन सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरातील रुग्णांना शहरातच नेत्रविकारांवरील उपचार उपलब्ध होणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन डॉ. संतोष पोखरकर व डॉ. प्राजक्ता पोखरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. किशोर पोखरकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. संतोष पोखरकर यांनी आभार मानले.

Visits: 127 Today: 1 Total: 1107297

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *