महेश पतसंस्थेमध्ये दीपावलीनिमित्त वाहन कर्ज योजनेचा शुभारंभ
महेश पतसंस्थेमध्ये दीपावलीनिमित्त वाहन कर्ज योजनेचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या अर्थकारणाला वेगळा आयाम देणार्या व अल्पावधीत नावलौकिक प्राप्त झालेल्या शहरातील अग्रगण्य महेश नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खास दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावर आकर्षक फेस्टिवल वाहन कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सदर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी राजेंद्र होंडाचे संचालक सीए.कैलास सोमाणी, मालपाणी बजाजचे संचालक सचिन पलोड, पद्मावती हिरोचे संचालक सुमित मणियार, पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मणियार, उपाध्यक्ष विशाल नावंदर, योगेश जाजू, डॉ.शशीकांत पोफळे, डॉ.राजेंद्र मालपाणी, ज्योती कासट, संतोष चांडक, व्यवस्थापक दिगंबर आडकी व कर्मचारी उपस्थित होते. या योजनेंतर्गत फक्त 8.88 टक्के व्याजदराने, कमी वेळेत कोटेशनच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच या योजनेत सहभागी होणार्या प्रत्येक ग्राहकास संस्थेतर्फे खास दोन गिफ्ट व्हाऊचर सप्रेम भेट म्हणून देण्यात येत आहे. ही योजना 21 नोव्हेंबर, 2020 पर्यंत असून ग्राहकांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. संस्थेतर्फे ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबविल्या जातात यामध्ये सोनेतारण व एलआयसी पॉलिसी तारण कर्ज योजना विना जामीनदार व कमी कागदपत्रांमध्ये 8 टक्के व्याजदरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या सर्व योजनांचे ग्राहक व व्यापार्यांकडून स्वागत होत असून पतसंस्थेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संचालक मंडळाने सांगितले आहे.