महसूलचा विक्रम; एका दिवसात 72 हजार 700 सातबारे डाउनलोड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला लोकाभिमुखता व गतिमानता देण्याबरोबर संगणकीकृत केले. ऑनलाईन सातबारा ही संकल्पना राबविल्यामुळे बुधवारी (ता.23) राज्यात एकाच दिवसात 72 हजार 700 नागरिकांनी आपले सातबारे डाउनलोड केल्याने एक मोठा विक्रम महसूल विभागाच्या नावावर नोंदला गेला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्रीपदाच्या काळात या विभागाला अधिकाधिक लोकाभिमुख व गतिमानता देण्याबरोबर हायटेक केले. याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत 80 लाख दाखले देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे महसूल विभागाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सुद्धा नोंद झाली आहे. आता नव्याने या विभागाचा कार्यभार सांभाळताना मंत्री थोरात यांनी सामान्य माणसाच्या सोयीकरता महसूल विभागांतर्गत ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, ई-मोजणी असे विविध उपक्रम राबवले. बुधवारी राज्यात 72 हजार 700 सातबारे डाउनलोड झाले असून राज्य सरकारला 23 लाख रुपयांचा महसूल एका दिवसात प्राप्त झाला आहे.

Visits: 265 Today: 1 Total: 1985380

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *