जांबुत बुद्रुक येथून इलेक्ट्रिक मोटार व केबलची चोरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील योगेश उत्तम कडलग या शेतकर्याची मुळा नदी पात्रातून अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक मोटार व पन्नास फुट केबल चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.16) उघडकीस आली आहे. यापूर्वीही मुळा नदी पात्रातून इलेक्ट्रिक मोटारी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जांबुत बुद्रुक येथील योगेश कडलग या शेतकर्याची मुळा नदी पात्रात इलेक्ट्रिक मोटार व पन्नास फुट केबल होती. अज्ञात चोरट्याने बुधवारी नदीपात्रातून मोटार व केबल चोरून पोबारा केला आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 136/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.
