स्नेहल मेहेत्रेला एम. एस. पदवी प्रदान

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील शेकईवाडी येथील स्नेहल बाळासाहेब मेहेत्रे हिने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठाची एम. एस. ही उच्च पदवी संपादित केली आहे. अमेरिकास्थित स्नेहलला ही पदवी विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शानदार पदवीदान ऑनलाईन कार्यक्रमात प्रदान केली आहे.

स्नेहल ही अकोले येथील मॉडर्न विद्यालयाची विद्यार्थिनी असून एस. एस. सी. परीक्षेत ती प्रथम आलेली आहे. तिने पुणे येथील कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. संगणक व एम. बी. ए. या पदव्या संपादित केल्या आहेत. यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील यूनिव्हर्सिटी ऑफ सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठात एम. एस. हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम तिने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. विद्यापीठाने नुकत्याच आयोजित केलेल्या शानदार ऑनलाईन पदवीदान कार्यक्रमात तिला ही पदवी प्रदान केली आहे. अगस्ति महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व पत्रकार प्रा.बाळासाहेब मेहेत्रे व प्रवरा विद्यालय इंदोरीतील माध्यमिक शिक्षिका सविता मेहेत्रे यांची कन्या आहे. स्नेहलचे राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, मॉडर्न विद्यालयाचे प्राचार्य संतोष कचरे, मुख्याध्यापक लक्ष्मण सावंत, माजी प्राचार्य शिरीष देशपांडे, माजी प्राचार्य अयाज शेख आदिंनी केले आहे.

