चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश; 70 लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन राहुरी कारखाना येथे सापळा लावून चंदन तस्कर टोळीच्या शनिवारी (ता.12) मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 650 किलो चंदनासह टेम्पो असा 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून छापा टाकला असता अंदाजे 61 लाख रुपये किंमतीचे 650 किलो चंदन (प्रति किलो 9500 प्रमाणे) आणि 10 लाखांचे वाहन असा एकूण 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. या प्रकरणी अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32, रा.अंजामैल हाऊस, ता.बैदाडका, जि.कासारगुड, केरळ) व अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय 41, रा.अमितकला हाऊस, ता.ऐनमाकजा, जि.कासारगुड, केरळ) यांच्याविरुध्द राहुरी पोलिसांत प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदीप मिटके, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, नीलेशकुमार वाघ, सहा. फौजदार राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ. सुरेश औटी, पो.ना.जानकीराम खेमनर, पो.कॉ.गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदिंनी केली.

Visits: 228 Today: 1 Total: 2124657

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *