घरगुती भांडणातून सुरेगाव शिवारात एकाचा खून
![]()
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
घरगुती भांडणाच्या कारणावरुन तिघांनी मिळून शस्त्राने वार करीत खून केल्याची घटना नुकतीच सुरेगाव शिवारात (ता.कोपरगाव) घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लताबाई बाबुराव निकम (रा.सुरेगाव) यांचे पती बाबुराव छबुराव निकम यांच्याशी नेहमी घरगुती कारणावरुन भांडण होत असे. या कारणावरुन सवत झुंबरबाई बाबुराव निकम हिचा मुलगा प्रफुल्ल बाबुराव निकम, झुंबरबाईचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे यांनी मिळून बाबुराव छबुराव निकम यांना सुरेगाव शिवारात सुरेगाव-कोळगाव थडी रस्त्यावरील उसाच्या शेताजवळील नालीत काहीतरी टणक शस्त्राने वार करून जीवे ठार मारले. यावरुन पोलिसांनी सोनू उर्फ प्रफुल्ल निकम व सोपान कोपरे या दोघांवर भादंवि कलम 302, 323, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
