रविवारी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 14 मधील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवारी (ता.13) सकाळी 11 वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे आणि कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

संगमनेर नगरपालिकेने विविध विकासकामांच्या माध्यमातून राज्यात लौकिक प्राप्त केला आहे. स्वच्छता अभियानातही आघाडीवर राहिली आहे. काळानुरुप शहरवासियांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका कायमच कटिबद्ध राहिली आहे. त्यानुसारच रविवारी सकाळी शहरातील सर्व प्रभागांत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, बांधकाम सभापती सुनंदा दिघे, शिक्षण समिती सभापती वृषाली भडांगे, पाणी पुरवठा समिती सभापती मालती डाके, आरोग्य समिती सभापती मनीषा भळगट, महिला व बालकल्याण समिती सभापती शबाना बेपारी, उपसभापती सुहासिनी गुंजाळ, नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सोनाली शिंदे, रुपाली औटी, कुंदन लहामगे, बाळासाहेब पवार, सुमित्रा दिड्डी, शमा शेख, इब्राहिम देशमुख, नूरमोहमंद शेख, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, प्रियंका भरीतकर, राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, मेघा भगत, योगिता पवार, नासिमबानो पठाण, डॉ.शहानवाज (दानिश) खान, हिरालाल पगडाल, वसीम शेख, रिजवान शेख, योगेश जाजू, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Visits: 170 Today: 1 Total: 1917906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *