अकोले तालुक्यात महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच अत्याचाराच्या घटना उजेडात! अल्पवयीन मुलीवर अत्याचार तर पोलीस दलातील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

नायक वृत्तसेवा, अकोले
महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच अकोलेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. यामुळे सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

यातील पहिली घटना अशी की, तालुक्यातील एक 17.5 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सोमनाथ रामभाऊ पथवे (रा.विठा) याने बळजबरीने 17 नोव्हेंबर, 2020, 22 नोव्हेंबर, 2020 व 15 फेब्रुवारी, 2021 रोजी आढळा धरण, गर्दणी डोंगर व विठा येथील घरी अत्याचार केला. त्यावेळी आरोपी पथवे याची वहिणी ताई रामचंद्र पथवे, आई सावित्रीबाई रामभाऊ पथवे यांनी पीडित अल्पवयीन मुलीला धक्काबुक्की करुन घरात कोंडून ठेवले होते. मात्र, पीडितेने अंघोळीचा बहाणा करुन तेथून पळ काढला आणि पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अकोले पोलिसांनी गुरनं. 74/2021 भा.दं.वि. कलम 376(2) (छ), 366, 313, 342, 323, बालकांचे लैंगिक अपराधांपासून सरक्षंण अधिनियम 2012 चे कलम 4, 5(ज), 2(ल), 8, 12, 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी पथवे हा गृहरक्षक दलात जवान असल्याचे समजते. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे करत आहे.

तर दुसर्‍या घटनी कौटुंबिक हिंसाचाराची आहे. म्हाळादेवी देवी (हल्ली रा.भांडूप-मुंबई) येथील 32 वर्षीय महिला पोलीस अमृता विक्रम हासे यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की 6 मे, 2007 ते 9 मे, 2009 पर्यंत म्हाळादेवी येथे सासरी नांदत असताना पती विक्रम दशरथ हासे, सासू भीमाबाई दशरथ हासे, सासरे दशरथ शंकर हासे, नणंद सुनीता देवराम सावंत यांनी शारीरिक व मानसिक छळ करुन तारण असलेली जमीन सोडविण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच अंगावरील दागिने काढून घेऊन घरातून हाकलून दिल्याचे म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी गुरनं.73/2021 भा.दं.वि. कलम 489, 406, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आहेर हे करत आहे. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच दोन्ही घटना घडल्याने सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

Visits: 100 Today: 1 Total: 1098800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *