रत्ननिधी ट्रस्टकडून वीस ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजाराम दिघे यांना तहसीलदार अमोल निकम यांनी व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने नुकतेच ग्रामीण रुग्णालयास वीस ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट दिले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता संगमनेर प्रशासनाने आत्तापासूनच पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार निकम यांनी केलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिघे यांना केलेल्या विनंतीनुसार वरील मदत ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या मदतीबद्दल रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्राम सामाजीक परिवर्तन फाऊंडेशन यांचे स्थानिक प्रशासनाने आभार मानले.
