वादळी पावसामुळे शिरसगाव परिसरातील पिकांचे नुकसान
वादळी पावसामुळे शिरसगाव परिसरातील पिकांचे नुकसान
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील शिरसगाव परिसरात रविवारी (ता.6) सायंकाळी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडल्याने या भागातील शेतकर्यांचे उसासह सोयाबीन, मका, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी सायंकाळी शिरसगाव परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांची धावपळ उडाली. या वादळी पावसात ऊस, मका, सोयाबीन पिके आडवी झाली, तर कपाशीचेही मोठे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी झाडे पडली आहेत. वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. शिरसगाव मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील बाळासाहेब गवारे यांच्या वस्तीवरील एक झाड वीजेच्या खांबावर पडल्याने शिरसगावसह महाविद्यालय परिसर, प्रगती नगरचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर गोदावरी पट्ट्यातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1110965
