कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरातील नवरात्रौत्सव रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचा निर्णय; प्रशासनाला दिली माहिती

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील बारी येथील ग्रामस्थ व कळसूबाई देवस्थान ट्रस्टने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रौत्सव 7 ऑक्टोबर रोजी असून, विजयादशमी 15 ऑक्टोबरला असून या कालावधीत पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी करण्यात आल्याचा निर्णय रविवारी (ता.3) झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे, भीमराज अवसरकर यांनी दिली आहे.

याबाबत तहसीलदार, अकोले सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजूर वनविभाग यांना कळविण्यात आले आहे. कळसूबाई शिखरावर दरवर्षी एक लाख भाविक येतात त्यांचे नियोजन करणे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. सरकारने याबाबत काही निर्बंध लादले असून त्यात देवळात जाता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये पाच फुटाचे अंतर, मास्क, सॅनिटायझर या गोष्टी तसेच आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी यांचे अपुरे नियंत्रण त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून राज्यातून व राज्याबाहेरील पर्यटक भाविक यांच्यामुळे अडचण येण्याची शक्यता असून प्रशासनाने याबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा करून ग्रामस्थांना व मंदिर ट्रस्टला कळवावे अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे नवरात्रौत्सव रद्द करण्यात आल्याने पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम खाडे, वाळू खाडे, सीताराम खाडे, निवृत्ती चव्हाण, भीमराज अवसरकर, पांडुरंग खाडे आदिंच्या लेखी पत्रावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *