श्री श्री 1008 अवधूत नर्मदानंद बापजी यांचे संगमनेरात आगमन
श्री श्री 1008 अवधूत नर्मदानंद बापजी यांचे संगमनेरात आगमन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत देशातील जल, जंगल व गोमातेचे संरक्षण करणे, वाढती लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच जल, वायू प्रदूषण रोखण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. तसेच जास्तीत जास्त शेततळे, पाझर तलाव यांच्या मार्फत पृथ्वीची जलभरणी करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अन्न-पाण्यासाठी युध्द करावे लागेल, असे प्रतिपादन श्री श्री 1008 अवधूत नर्मदानंद बापजी यांनी केले.
टाळेबंदी काळात सर्व नद्या 100 वर्षांपूर्वी इतक्या स्वच्छ झाल्या आहेत. कोरोना महामारीचा काळ निघून जाईल, कोरोना महामारीच्या काळात मातृभूमीच्या सेवेत असणारे डॉक्टर, पोलीस, प्रशासन यांच्याविषयी आदर ठेवला पाहिजे, असे आवाहन सत्संगवेळी नर्मदानंद बापजी यांनी केले. जल, जीवन व जंगल संरक्षण या उद्देशाने श्री श्री 1008 नर्मदानंद बापजी यांनी ‘राष्ट्र धर्म विजय यात्रा’ ही पदयात्रा 29 ऑगस्ट, 2019 रोजी गंगोत्री धाम येथून आरंभ केली आहे. 11 हजार किलोमीटरच्या यात्रेत देशातील बारा ज्योतिर्लिंग पदयात्रा करून ते हिंदू जनजागृती करणार आहेत. यात्रेदरम्यान भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर दरम्यान संगमनेर तालुक्यातून सोमवारी (ता.7) सकाळी 6:15 वाजता चंदनापुरी गावातील मूळगंगा मंदीर-रायतेवाडी फाटा-संगमनेर खुर्द मार्गे चंद्रशेखर चौक येथे सकाळी 8:30 वाजता रंगारगल्ली-कॅप्टन लक्ष्मी चौक-नगरपालिका-चावडी-अशोक चौक-शिवराय स्मारक-बस स्थानक-घुलेवाडी-जीवदया गो-शाळा या मार्गात पुष्पवृष्टी व रांगोळी काढून संगमनेर शहरातील हिंदू बंधू-भगिनींनी जलोषात स्वागत केले. कर्हे घाटातील जीवदया गो-शाळा येथे सायंकाळी 6:00 वाजता सुरक्षित अंतराचे पालन करून सत्संग होणार असून यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.