आनंदऋषीजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुमतीलाल भंडारी तर व्हाईस चेअरमनपदी गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारात अग्रगण्य असणारी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कापड व्यावसायिक सुमतीलाल भंडारी व व्हाईस चेअरमनपदी गणेश ढोरे यांची नुकतीच निवड झाली आहे.

कोरोना महामारीमुळे शासनाच्या नियमांनुसार ऑनलाईन झालेल्या बैठकीत चेअरमनपदासाठी सुमतीलाल भंडारी व व्हाईस चेअरमनपदासाठी गणेश ढोरे यांचे एकमेव अर्ज आल्याने उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी शेख यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. या बैठकीस संचालक राजकुमार गांधी, नंदनमल बाफना, आनंद दर्डा, प्रीतेश पारख प्रत्यक्ष तर आदी संचालक ऑनलाईन सहभागी झाले होते. कोरोना संकटातही संस्थेने उत्कृष्ट कारभार पाहत उंचीवर नेले आहे. यामध्ये अधिक क्षमतेने काम करुन संस्थेला उत्तुंग शिखरावर नेण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष सुमतीलाल भंडारी यांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्याच्या कठीण काळातही उत्कृष्ट कारभार करुन संस्थेचा कारभार 100 कोटींच्या पुढे नेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शेवटी संस्थेचा कारभार करण्यासाठी दिलेल्या संधीबद्दल सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक, कर्मचारी व हितचिंतकांचे आभार मानले. सदर निवडीबद्दल नूतन पदाधिकार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *