कोपरगावात रविवारी 47 कोरोनाबाधित सापडले

कोपरगावात रविवारी 47 कोरोनाबाधित सापडले
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव शहरासह तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. रविवारी (ता.6) तालुक्यात तब्बल 47 नव्या रुग्णांची भर पडली असल्याने बाधितांचा आकडा 1051 वर पोहोचला आहे.


रविवारी (ता.6) अहमदनगर येथे कोरोना तपासणीसाठी पाठविलेल्या स्त्रावांपैकी 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून एकजण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 111 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी कोपरगाव शहर व ग्रामीण असे 35 रुग्ण बाधित आढळून आले. 76 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोपरगाव शहरातील धारणगाव रस्ता 1, महादेव नगर 6, येवला रस्ता 1, शारदानगर 1, बिरोबा चौक 1, विवेकानंदनगर 1, साईनगर 1, शिंगीनगर 1, न्यायालय रस्ता 1, लक्ष्मीनगर 2, साईसिटी 2, गजानन नगर 8 असे एकूण 26 रुग्ण शहरात आढळले. तर ग्रामीण भागातील जेऊर कुंभारी 1, कोकमठाण 1, संवत्सर 1, चासनळी 5 असे 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. शहर व ग्रामीण मिळून एकूण 35 व खासगी लॅबमधील 1 व अहमदनगर येथील अहवालामधील 12 जण बाधित असे एकूण 47 बाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

Visits: 43 Today: 1 Total: 435771

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *