संगमनेर तालुका ग्राहक संरक्षण समिती जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत सरकार नोंदणीकृत असलेल्या ग्राहक संरक्षण समितीच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी नामवंत नाटककार डॉ.सोमनाथ मुटकुळे, कार्याध्यक्षपदी संदीप वाकचौरे तर सचिवपदी अरुण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन केली आहे.

भारत सरकारने ग्राहक संरक्षण कल्याण अधिकार अधिनियम 1986/2019 तयार केला आहे. त्या संदर्भाने ग्राहकांच्या अधिकारासंबंधी जागृती घडविण्यासाठी समितीच्यावतीने काम करण्यात येणार आहे. त्यासंबंधी नुकतीच समितीची घोषणा करण्यात आली असून उपाध्यक्षपदी शेखर साबळे, सहसचिवपदी सतीश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार गोरख मदने, कायदेशीर सल्लागारपदी वकील अनिल घुले, संघटकपदी संदीप वलवे, सहसंघटकपदी प्रा.डॉ.राहुल हांडे, तालुका संपर्क प्रमुखपदी प्रा.शरद सावंत, सहसंपर्क प्रमुखपदी सुनील हासे, सल्लागारपदी सूर्यकांत शिंदे, वैद्यकीय सल्लागारपदी डॉ.किशोर पोखरकर, कार्यकारिणी सदस्यपदी बाळासाहेब नवले, शांताराम डोंगरे, बाळासाहेब राऊत, वसंत बंदावणे, दिलीप डोंगरे, प्रताप सहाणे, विलास वर्पे, प्रा.संदीप आरोटे, अॅड.श्रीकृष्ण गिते यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत ग्राहकांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी तमाशा कलावंत कांताबाई खेडकर व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे निधऩ झाले. तसेच इतरही ज्ञात-अज्ञात नागरिकांचे निधन झाल्याबद्दल गोरख मदने यांनी शोकप्रस्ताव मांडला, त्यानंतर आदरांजली वाहण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक संदीप वाकचौरे यांनी केले, स्वागत अरुण देशमुख यांनी केले तर आभार वसंत बंदावणे यांनी मानले. तालुका कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष केदारे, उपाध्यक्ष संदीप जाधव, महासचिव राजेश आंधळे, महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश घोळवे, राज्य सचिव प्रा.सत्यजीत जानराव, कार्याध्यक्ष निवृत्ती रोकडे आदिंनी अभिनंदन केले आहे.

ग्राहकांच्या हिताला प्राधान्य ः डॉ.मुटकुळे
देशात ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देणारे कायदे करण्यात आले आहेत. त्या कायद्याने ग्राहकांच्या अधिकाराचे जतन करणे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकर्यांपासून तर विविध क्षेत्रातील ग्राहक व विक्रेते यांच्यात कायद्याविषयी जागृती घडवून आणून व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तालुक्यात यादृष्टीने गावोगावी प्रबोधन करणारे मेळावे घेण्यात येतील. नागरिकांनी देखील आपल्या अधिकाराची जाणीव ठेऊन वर्तन केले तर त्यांची होणारी लुटमार थांबू शकेल.
– डॉ.सोमनाथ मुटकुळे (अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती)
