श्री गुरुदत्त पेट्रोलियमचा मंगळवारी शुभारंभ

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा-अकलापूर रस्ता येथे मंगळवारी (ता.2) दुपारी 4 वाजता श्री गुरुदत्त पेट्रोलियमचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संचालक प्रकाश भालके यांनी दिली आहे.

या शुभारंभप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, अकलापूरचे सरपंच अरुण वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश भालके यांनी केले आहे.

Visits: 251 Today: 1 Total: 2173350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *