संगमनेर तालुक्याचे कोविड संक्रमण आटोक्यात येईना! किराणा व कापड व्यवसायातील पंधरा कामगारांचे अहवालही पॉझिटिव्ह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णसंख्येत मोठी घट होवून अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील सामान्य व्यवहारांवरील मर्यादा शिथील होत असतांना अहमदनगर जिल्ह्यात काही तालुक्यातील संक्रमण मात्र अद्यापही आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी संगमनेर वगळता उर्वरीत सर्व तालुक्यातील रुग्णसंख्या दोन आकड्यात येवून जिल्हा प्रदीर्घ कालावधीनंतर हजाराच्या आंत आलेला असतांना आज कोविड बाधितांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतली. आजच्या अहवालातून संगमनेरसह नेवासा व श्रीगोंदा तालुक्यातून तीन आकडी रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यात आजही सर्वाधीक 153 रुग्ण संगमनेरातून समोर आले असून गेल्या सहा दिवसातील तालुक्याची ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. आजच्या अहवालात शहरातील किराणा व कापड दुकानातील पंधरा कामगारांच्या अहवालांसह शहरातील 37 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. आजच्या रुग्णसंख्येने तालुका आता 21 हजार 894 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.


गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने जिल्ह्याच्या एकूण सरासरी रुग्णवाढीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आजपासून (1 जून) अनलॉक प्रक्रीयेतून जिल्ह्यातील अत्यावश्यक वगळता अन्य व्यवसायांना काही प्रमाणात सवलत मिळेल अशी अपेक्षा असतांना जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येने त्यात खोडा घातला. मागील सात दिवसांत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील संक्रमणाच्या सरासरी गतीमध्ये मोठी घट झाली आहे. 26 मे ते 1 जून या सात दिवसांच्या कालावधीत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 1 हजार 474 रुग्ण या गतीने 10 हजार 317 रुग्णांची वाढ झाली. तर दररोज सरासरी 137 रुग्ण या गतीने संगमनेर तालुक्यातून 962 रुग्ण समोर आले. संपूर्ण मे महिन्यातील सरासरीचा विचार करता जिल्ह्यात सरासरी 2 हजार 810 रुग्ण दररोज या वेगाने एकूण 87 हजार 95 तर संगमनेर तालुक्यात सरासरी 279 रुग्ण दररोज या गतीने 8 हजार 655 रुग्णांची वाढ झाली. मात्र गेल्या सात दिवसांत त्यात निम्म्याहून अधिक घट झाल्याचे दिसत आहे.


जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाचा वेग मंदावत असल्याचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाने 1 जूनपासून सर्व व्यवहार खुले करण्याची पूर्वतयारी म्हणून सर्व व्यापार्‍यांची व त्यांच्या दुकानांमध्ये काम करणार्‍या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगमनेरातील विविध आस्थपानातील मालक आणि कामगार यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील काही जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात संगमनेरातील कापड दुकानातील तीन महिलांसह आठ जणांना, तर किराणा व भूसार मालाच्या दुकानातील पाच महिलांसह सात जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यावरुन शासन आणि प्रशासनाने दुकाने सुरु करण्यापूर्वी मालक व कामगारांच्या स्राव चाचणीचा घेतलेला निर्णय किती फायदेशीर ठरला हे स्पष्ट होते.


आज शासकीय प्रयोगशाळेच्या 110, खासगी प्रयोगशाळेच्या 33 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा दहा अशा तालुक्यातील एकूण 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेरातील 37 जणांचा समावेश आहे. शहरातील साळीवाडा परिसरातील 22 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 64, 42 व 30 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 57 व 47 वर्षीय इसमांसह 47 व 37 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय तरुणीसह 13 वर्षीय मुलगी, ताजणे मळ्यातील 55 वर्षीय इसमासह 26 व 22 वर्षीय महिला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती प्रतिमेच्या परिसरातील 31 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 28 वर्षीय तरुण, लालाजी चौकातील 47 वर्षीय इसम, स्वातंत्र्य चौकातील 37 वर्षीय तरुणासह 15 वर्षीय मुलगी, मेनरोडवरील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 व 45 वर्षीय इसम आणि 35 वर्षीय तरुण,


देवाचा मळा परिसरातील 36 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 55 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 42 व 35 वर्षीय महिलांसह 26 वर्षीय तरुण, देवी गल्लीतील 31 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 40, 39 व 30 वर्षीय तरुणांसह 61 व 26 वर्षीय महिलांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील 55 गावे व वाड्यावस्त्यांवरील 116 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले असून त्यात धांदरफळ बु. येथील 25 वर्षीय तरुण, सावरचोळ येथील 40 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 30 वर्षीय महिला, मेंढवण येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, झोळे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 45 वर्षीय इसम, घारगाव येथील 28 वर्षीय तरुण, शेळकेवाडीतील 31 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 58 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला,


दरेवाडीतील 23 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालिका, कर्जुले पठारावरील 31 वर्षीय तरुण, वरुडी पठारावरील 34 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 30 व 23 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 29 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 29 वर्षीय तरुण, देवकौठे येथील 35 वर्षीय महिला, कासारे येथील 25 वर्षीय तरुण, लोहारे येथील 36 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगी, चिंचोली गुरव येथील 35 व 30 वर्षीय महिला आणि 35 वर्षीय तरुण, मिरपूर येथील 70 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 42 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला, साकूर येथील 35 वर्षीय तरुणासह 27 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय तरुणी, कोंची येथील 25 वर्षीय महिला, बोटा येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 व 25 वर्षीय तरुण आणि 63, 55 व 36 वर्षीय महिला, शेडगाव येथील 48 वर्षीय दोघे इसम, प्रतापपूर येथील 29 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 35 वर्षीय तरुण,
धांदरफळ बु. येथील 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55, 50 व 45 वर्षीय इसम आणि 26 वर्षीय तरुण,

चिकणी येथील 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय तरुण, कोळवाड्यातील 43 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 22 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 72 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45, 40 व 28 वर्षीय महिला 19 वर्षीय तरुण आणि 17 वर्षीय तरुणी, पिंप्री येथील 35 वर्षीय तरुण, पावबाकीतील 55 वर्षीय इसमासह 11 वर्षीय दोन मुली, घुलेवाडीतील 74 व 67 वर्षीय महिलांसह, 51 वर्षीय इसम, 32, 31, 29, 24 व 20 वर्षीय तरुण आणि 10 वर्षीय मुलगा, सुकेवाडीतील 55 वर्षीय इसम, निमगाव जाळीतील 60 वर्षीय महिला, कौठे कमळेश्‍वर येथील 40 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 49 व 30 वर्षीय महिलांसह 27 वर्षीय तरुण, मालदाड येथील 49 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालिका, दाढ खुर्द येथील 39 वर्षीय तरुण,


पेमगिरीतील 54 व 48 वर्षीय इसमांसह 50, 45 व 43 वर्षीय महिला, 39, 24, व 21 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलगा, निमज येथील 58 व 46 वर्षीय इसमांसह 23 वर्षीय तरुण, पोखरी हवेलीतील 57 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 36 वर्षीय महिला, राजापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 43 व 35 वर्षीय महिला, खराडी येथील 42 वर्षीय महिला, मांडवे बु. येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहिमपूर येथील 37 व 30 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 50 व 29 वर्षीय महिला आणि तीन वर्षीय बालक, कर्‍हे येथील 74 व 59 वर्षीय महिलांसह नऊ वर्षीय मुलगा आणि सात वर्षीय मुलगी, चणेगाव येथील 21 वर्षीय तरुणी आणि खळी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा तालुक्यातील एकूण 153 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 894 झाली आहे.


जिल्ह्यात आज 54 जणांचा कोविड बळी!
एकीकडे जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत एकसारखी घट होत असतांना दुसरीकडे जिल्ह्यात कोविड बाधित होवून बळी जाणार्‍या संख्येने मात्र सातत्य कायम ठेवले असून आजही जिल्ह्यातील 54 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोविड संक्रमणातून बळी गेलेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता 3 हजार 272 झाली आहे. आज जिल्ह्यातील 1 हजार 963 जणांनी उपचार पूर्ण केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्यात 1 हजार 152 नवीन बाधितांची भर पडली. जिल्ह्यातील उपचार पूर्ण करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या आता 2 लाख 49 हजार 996 झाली असून रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेगही 94.95 टक्क्यांवर गेला आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेच्या 375, खासगी प्रयोगशाळेच्या 428 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीच्या 349 निष्कर्षातून जिल्ह्यातील 1 हजार 152 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात जिल्ह्यात सर्वाधीक 153 रुग्ण संगमनेर तालुक्यात, 137 रुग्ण नेवासा तालुक्यात तर 118 रुग्ण श्रीगोंदा तालुक्यातून समोर आले आहेत. उर्वरीत तालुक्यात शेवगाव 89, पारनेर 86, अकोले 82, राहाता 73, श्रीरामपूर 71, नगर ग्रामीण 66, जामखेड 61, राहुरी 54, पाथर्डी 51, कर्जत 38, अहमदनगर महापालिका क्षेत्र 36, कोपरगाव 20, इतर जिल्ह्यातील 12 व भिंगार लष्करी परिसरातील पाच रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 63 हजार 287 झाली आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 1574596

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *