जिल्ह्याची सरासरी खालावली; मात्र संगमनेरात संक्रमणाची गती कायम! आजही शहरातील चाळीस जणांसह तालुक्यातील दिडशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या एकूण सरासरी रुग्णगतीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जवळपास दिड महिन्याहून अधिक काळापासून रोजच्या वाढत्या संक्रमणाने धास्तावलेल्या जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी रोजच्या आडेवारीतून संगमनेर तालुक्यातील संक्रमणाची गती अद्यापही कायम असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आजही शहरातील 40 जणांसह तालुक्यातील एकूण 151 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 19 हजार 616 झाली आहे. चालू महिन्यात तालुक्याच्या संक्रमणगतीने तिनशेचा टप्पा ओलांडला असून आजही रुग्णवाढीची गती 326 रुग्ण प्रतिदिवस या सरासरीवर कायम असून गेल्या सतरा दिवसांत तालुक्यात तब्बल 5 हजार 534 रुग्णांची भर पडली आहे.


गेल्या संपूर्ण महिनाभर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या कोविड संक्रमणाला चालू महिन्यातील सुरुवातीचा आठवडा वगळता अहमदनगर महापालिका क्षेत्रासह नगर ग्रामीण, राहाता, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव भागात काहीसा ब्रेक लागला आहे. मागील महिन्यात राहाता तालुक्याने आघाडी घेतल्याने अहमदनगर महापालिका क्षेत्रापाठोपाठ तेथील संख्या मो÷या प्रमाणात फुगली, मात्र चालू महिन्यात तेथील संक्रमणाला अचानक ओहोटी लागल्याने राहाता तालुक्याची जागा आता संगमनेर तालुक्याने पटकाविली आहे. मे महिन्यात अहमदनगर महापालिका, आणि नगर ग्रामीण नंतर सर्वाधीक रुग्ण संगमनेर तालुक्यातूनच समोर येत आहेत.


आज खासगी प्रयोगशाळेकडून मिळालेले 135 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेले सोळा अशा एकूण 151 अहवालातून शहरातील 40 जणांसह एकूण 151 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील 38 वर्षीय तरुणाचा समावेश आहे, तर दोघांचे अहवाल दोनवेळा नोंदविले गेले आहेत. आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील अभंगमळा येथील 43 वर्षीय महिला, जनता नगरमधील 85 वर्षीय वयोवृद्धासह 37 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालक, कुरण रोडवरील 68 वर्षीय महिला व 58 वर्षीय इसम, नायकवाडपूर्‍यातील 30 वर्षीय तरुण,


अकोले नाका परिसरातील 34 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 56 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय दोन तरुण, अभिनव नगरमधील 56 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण व अकरा वर्षीय मुलगा, मालदाड रोडवरील 45 वर्षीय इसमासह 37 व 28 वर्षीय तरुण, ताजणे मळ्यातील तीन वर्षीय बालिका, मोमीनपूर्‍यातील46 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, गोविंदनगर मधील 45 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्या 74 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 47 वर्षीय इसम, 43, 39, 36, 31, 30 व 25 वर्षीय तरुण, 62 वर्षीय दोन, 60, 40, 35, 34 व 33 वर्षीय महिला संक्रमित झाल्या आहेत.


तर तालुक्यातील 54 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील 108 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात पानोडी येथील 28 वर्षीय तरुण, निमज येथील 48 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 48 वर्षीय इसमासह 25 व 23 वर्षीय तरुण, 45 व 32 वर्षीय महिला, राजापूर येथील 52 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण, देवगाव येथील 70 वर्षीय महिलेसह 56 वर्षीय इसम, चिखली येथील 45 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 42 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 45 वर्षीय इसमासह 44 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, मालदाड येथील 70 वर्षीय महिला, डोळासणे येथील 30 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 33 वर्षीय तरुण,


वडझरी येथील 25 वर्षीय महिला, पोखरी हवेलीतील 25 वर्षीय तरुण, बोटा येथील 23 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 35 वर्षीय तरुण, साकूरमधील 48 व 45 वर्षीय इसम, कौठे कमळेश्‍वर येथील 28 वर्षीय तरुण, पारेगाव बु. येथील 55 वर्षीय इसम, मांडवे खुर्द येथील 36 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 30 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 26 वर्षीय महिला, अकलापूर येथील 43 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 28 वर्षीय महिला, म्हसवंडी येथील 20 वर्षीय तरुण, कर्‍हे येथील 21 वर्षीय तरुण, घारगावातील 30 वर्षीय तरुणासह 26 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 55 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालिका, निमगाव टेंभी येथील 64 वर्षीय ज्येश्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण, 28 वर्षीय महिला आणि 12 आणि आठ वर्षीय मुलगा,


चंदनापूरीतील 50 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 19 वर्षीय तरुण, निमोण येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 वर्षीय तरुण, 63, 38 व 35 वर्षीय महिला, भोजदरीतील 29 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 51 वर्षीय इसमासह 47 वर्षीय महिला, सायखिंडीतील 35 व 29 वर्षीय तरुण, लोहारे येथील 36 वर्षीय दोघांसह 19 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 34 व 24 वर्षीय महिलांसह 12 वर्षीय मुलगा, कनोलीतील 54 व 47 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 35 वर्षीय महिला, खांडगाव येथील 59 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 78 वर्षीय ज्येश्ठ नागरिकासह 42 वर्षीय तरुण,


घुलेवाडीतील 51 वर्षीय इसमासह 38, 23 व 20 वर्षीय तरुण, 75, 65 व 47 वर्षीय महिला, वाघापूर येथील 37 वर्षीय तरुण, मिर्झापूर येथील 27 वर्षीय तरुण, पावबाकीतील 46 व 23 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडीतील 48, 47 व 45 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, 60, 28 व 27 वर्षीय महिला, श्रीराम नगरमधील 45 वर्षीय इसम, धांदरफळ बु. येथील 45 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, आश्‍वी खुर्द येथील एक वर्षीय बालक, निमागाव भोजापूर येथील 21 वर्षीय तरुणी, रहिमपूर येथील 47 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण व 34 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 50 वर्षीय इसम व पिंपरणे येथील 50 व 30 वर्षीय महिलांसह 39 व 33 वर्षीय तरुणाला कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्याला मिळाला आज मोठा दिलासा..
संगमनेर तालुक्यातील दररोजची रुग्णसंख्या चिंता वाढवणारी असली तरीही दुसरीकडे जिल्ह्याची सरासरी मात्र खालावत असल्याचे दिलासादायक चित्र गेल्या दोन-तीन दिवसांत समोर आले आहे, त्यात आजही सातत्य आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या 380, खासगी प्रयोगशाळेच्या 863 व रॅपिड अँटीजेनद्वारा 862 अहवालातून आज जिल्ह्यातील पाथर्डी 213, अकोले 205, नगर ग्रामीण 202, नेवासा 175, कोपरगाव 174, राहुरी 153, संगमनेर 151, अहमदनगर महापालिका क्षेत्र व पारनेर प्रत्येकी 129, शेवगाव 124, राहाता 100, श्रीरामपूर 94, श्रीगोंदा 78, कर्जत 68, जामखेड 52, इतर जिल्ह्यातील 33, भिंगार लश्करी परिसरातील 24 व लश्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 33 हजार 740 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *