महसूल मंत्र्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी; एकाविरोधात अदखलपात्र गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर समाज माध्यमांतून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.14) संगमनेर शहर पोलिसांनी एकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शहरातील चैतन्यनगर येथील अविनाश हौशीराम भोर याने फेसबुक या समाज माध्यमावरुन आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे त्यांच्या लौकिकास बाधा पोहोचून अपमान झाला आहे. या प्रकरणी सिद्धेश विनोद घाडगे (रा.खंडोबा गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी भोर याच्या विरोधात भादंवि कलम 499, 500, 501 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Visits: 41 Today: 1 Total: 420637