चोवीस तासांत संगमनेर तालुक्यातील चौघांचा कोविडने घेतला बळी! जिल्ह्यातील संक्रमणातही झाली वाढ; तालुक्याच्या रुग्णसंख्येत मात्र पाच दिवसानंतर घट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांसह संगमनेर व पारनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येवू लागल्याने चिंता निर्माण झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मोठ्या रुग्णसंख्येचे आकडे झेलणार्या या दोन्ही तालुक्यांसह पाथर्डी, कोपरगाव व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील दैनंदिन रुग्णसंख्येत आज घट नोंदविली गेली आहे. संगमनेर तालुक्यात गेल्या पाच दिवसांत आजची रुग्णसंख्या निचांकी असली तरीही गेल्या चोवीस तासांत तालुक्यातील चौघांचा बळी गेल्याने क्षणीक मिळालेल्या दिलाशालाही गालबोट लागले आहे. आजच्या अहवालातून तालुक्याच्या पठारभागातील रुग्णसंख्याही खाली आली असून साकूर परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यातील 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात पठारभागातील 49 जणांसह शहरातील शहरातील आठ व अन्य तालुक्यातील दोघा रुग्णांचा समावेश असून एकाचे नाव दुबार नोंदविले गेले आहे. तालुक्यातील रोजच्या रुग्णसंख्येत आज घट होण्यासह सक्रीय रुग्णांची संख्याही हजाराच्या आंत आली आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 25 हजार 382 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 943 आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 406 जणांचे कोविडने बळी घेतले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठारभागात कोविड संक्रमणाचा उद्रेक झाल्याने तालुक्याची अवस्था चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपले संपूर्ण लक्ष पठारभागावर केंद्रीत केले असून तेथील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये संशयीत रुग्णांचा शोध घेतला जात आहे. त्यातून लक्षणे असलेल्या रुग्णांना शोधून त्यांना कोविड केअर सेंटर अथवा कोविड उपचार केंद्रात दाखल केले जात असल्याने गेल्या चार दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आज मात्र घसरली असून बुधवारच्या तुलनेत पठारभागातून आज 49 रुग्ण समोर आले आहेत. आज तालुक्यातील एकूण 52 गावे आणि वाड्यावस्त्यांमधून रुग्ण समोर आले असून त्यात पठारभागातील 23 गावांचा समावेश आहे. पठारभागातील समृद्ध बाजारपेठ असलेल्या साकूरमधील संक्रमणातही आज मोठी घट झाली असून तेथून आज केवळ पाच रुग्ण समोर आले आहेत.
शासकीय प्रयोगशाळेचे पाच, खासगी प्रयोगशाहेचे 84 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 31 निष्कर्षातून समोर आलेल्या आजच्या रुग्णांमध्ये शहरातील देवाचा मळा येथील 70 वर्षीय महिला, चव्हाणपूरा येथील 37 वर्षीय तरुण, गणेशनगर येथील 43 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40, 35 व 24 वर्षीय तरुण आणि 45 वर्षीय महिलाचा समावेश आहे. तर तालुक्यातील तीगांव येथील 52 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 21 वर्षीय तरुण व 20 वर्षीय तरुणी, ओझर बु. येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, संगमनेर खुर्द येथील 22 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 78 व 42 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 55 वर्षीय इसमासह 50 व 33 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगा, चिंचोली गुरव येथील 65 व 34 वर्षीय महिलांसह 38 व 21 वर्षीय तरुण, 11 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथील 65, 43 व 40 वर्षीय महिलांसह 31 वर्षीय दोन तरुण, शिबलापूर येथील 35 वर्षीय तरुण,
सादतपूर येथील 45 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपरणे येथील 50 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 29 वर्षीय तरुण, निमज येथील 59 वर्षीय इसम, खळी येथील 45 वर्षीय इसमासह 33 वर्षीय तरुण, कणकापूर येथील 45 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रायते येथील 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 20 वर्षीय तरुणी, सायखिंडी येथील 54 वर्षीय इसम, आश्वी बु. येथील 16 वर्षीय मुलगा, मंगळापूर येथील 23 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 39 वर्षीय महिला, आश्वी खुर्दमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, 41 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी व 16 वर्षीय मुलगा, कोल्हेवाडी येथील 74 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 48 व 47 वर्षीय इसमांसह 43 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा, घुलेवाडी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय तरुण व 28 वर्षीय महिला,
धांदरफळ बु. येथील 52 व 51 वर्षीय इसम, 45 वर्षीय महिला, 42 व 30 वर्षीय तरुण, चिखली येथील 90 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 55 वर्षीय इसम, पठारभागातील साकूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय इसम, 36 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, एठेवाडीतील 59 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला, घागराव येथील 36 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथील 40 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 50 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण व 15 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 27 वर्षीय तरुण, बोटा येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव माथा येथील 55 व 35 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 29 वर्षीय तरुण, हिरेवाडीतील 55 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण व 20 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 37 वर्षीय तरुण,
जवळे बाळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण, म्हसवंडी येथील 70 वर्षीय महिलेसह 40 व 38 वर्षीय तरुण, नांदूर येथील 45 व 36 वर्षीय महिलांसह 30 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी व 13 वर्षीय मुलगा, खंदरमाळ येथील 55 वर्षीय इसम, 55 वर्षीय महिला आणि 30 व 27 वर्षीय तरुण, शेळकेवाडीतील 45 वर्षीय महिला, मांडवे येथील 60, 50 व 45 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 52 वर्षीय इसम, कौठे मलकापूर येथील 25 वर्षीय तरुण, सावरगाव घुले येथील 48 वर्षीय इसमासह 39 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा आणि वरवंडी येथील 46 वर्षीय महिला. यासोबतच अहमदनगर येथील 61 वर्षीय महिला व अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 24 वर्षीय महिलांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले असून आश्वी खुर्द येथील 16 वर्षीय मुलाचे नाव दोनवेळा नोंदविले गेले आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत प्रत्यक्षात आज 117 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता 25 हजार 382 झाली आहे.
जिल्ह्यात आज गेल्या चार दिवसांतील उच्चांकी रुग्ण समोर आले असून राहुरी, अकोले, कर्जत, जामखेड व श्रीरामपूर तालुक्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, तर सातत्याने मोठ्या रुग्णसंख्येचा फटका सहन करणार्या संगमनेर व पारनेर तालुक्यासह पाथर्डी, कोपरगाव व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या मात्र घटली आहे. आजही जिल्ह्यातील सर्वाधीक 120 रुग्ण संगमनेर तालुक्यातून समोर आले असून पारनेर 110, शेवगाव 78, अकोले 67, श्रीगोंदा 70, राहुरी 59, नेवासा 58, कर्जत 56, नगर ग्रामीण 51, श्रीरामपूर 45, जामखेड व राहाता प्रत्येकी 37, पाथर्डी 36, अहमदनगर महापालिका 25, कोपरागव 20, इतर जिल्ह्यातील 18 व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 3 हजार 473 झाली असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 22 लाख 35 हजार 481 जणांची स्राव चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची सरासरी गती 13.58 टक्के असून मृत्यूदर 2.07 टक्के आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत काहीशी घसरण झाली असून सरासरी 95.88 टक्के रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 6 हजार 229 रुग्ण सक्रीय आहेत.