बंदावणे यांना ‘प्रबुद्ध रत्न’ पुरस्कार जाहीर
बंदावणे यांना ‘प्रबुद्ध रत्न’ पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
इरिशियश फौंडेशन तर्फे ‘प्रबुद्ध रत्न’ या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेरचे कलावंत व पत्रकार वसंत बंदावणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मार्केटिंग हेड विकास कुमार स्नेही यांनी दिली.
सदर पुरस्काराचे वितरण 5 डिसेंबर, 2020 रोजी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. ज्यांनी कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पत्रकार, समाज सेवक, पोलीस, आशा सेविका अशा भारतीय रत्नांना प्रबुद्ध रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती फौंडेशन व पुरस्काराचे संस्थापक प्रवीण दामले यांनी दिली. पुरस्कारार्थी बंदावणे यांनी लॉकडाऊनच्या काळात गावचा इतिहास लिहिला. वर्तमान पत्रातून कोरोना विषयक जनजागृती करणारे लेख लिहिले. तसेच ‘राहत’ ही हिंदी फिल्म व इतरही शॉर्टफिल्म तयार करून जनतेला कोरोनाविषयी माहिती दिली. त्यांच्या या कामाची दखल फौंडेशनने घेत त्यांना पुरस्कार जाहीर केला. या कार्यक्रमाचे सहयोगी डॉक्टर भारती सक्सेना व डॉक्टर बिजोय चंद्रा हे आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे प्रभारी नरेश वानखडे यांनी दिली आहे.