पत्रकार संघाच्या सह-सचिवपदी अक्षय काळे
पत्रकार संघाच्या सह-सचिवपदी अक्षय काळे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कोपरगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे यांच्या आदेशान्वये कोपरगाव तालुकाध्यक्ष मनीष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली आहे. यामध्ये दैनिक नायकचे प्रतिनिधी अक्षय काळे यांची सह-सचिवपदी बिनविरोध निवड झाली असून सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नूतन कार्यकारिणीमध्ये कोपरगाव तालुकाध्यक्षपदी मनीष जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव विनोद जवरे, तालुका सह-सचिव विजय कापसे, कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, संघटक व प्रसिध्दी प्रमुख शिवाजी जाधव, संघटक लक्ष्मण जावळे, सह-संघटक फकिरराव टेके, रवींद्र जगताप, शहर संघटक योगेश गायके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्यासह सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

