राहुरीत कोरोनाने घेतला पाच जणांचा बळी

राहुरीत कोरोनाने घेतला पाच जणांचा बळी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यात शिक्षकाच्या पत्नीसह चार वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तालुक्यात आणखी 19 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


राहुरी तालुक्यात एकूण 528 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 380 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 129 जण लढा देत आहेत. दरम्यान, देसवंडी येथील शिक्षकाच्या पत्नीचा (वय 47) अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर लाख येथील दोन, तांभेरे व वांबोरी येथील प्रत्येकी एक वृद्धाचा कोरोना विषाणूनी बळी घेतला आहे.

Visits: 120 Today: 1 Total: 1121307

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *