तीनबत्ती हल्ला प्रकरणी दबावाला बळी पडू नये! संगमनेर बजरंग दलाचे पोलिसांना निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील तीनबत्ती चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर मुस्लीम समुदायातील जमावाने केलेल्या भ्याड हल्ला प्रकरणी राजकीय हस्तक्षेप वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच संगमनेर विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाने शहर पोलिसांना दिले आहे.

तीनबत्ती हल्ला प्रकरणी काही नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. यातील बहुतेकांचे नातेवाईकच आरोपी आहेत. तसेच दिवाळीनंतर पालिकेची निवडणूक असल्याने राजकीय दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तरी देखील आजपर्यंत पकडलेल्या आरोपींशिवाय अद्यापही आरोपी मोकाट असून शहराचे पोलीस निरीक्षक रजेवर गेले असल्याचे समजते. तरी लवकरात लवकर राजकीय दबाव न जुमानता अटक करावी. आपणा सोबत सर्व संगमनेरकर आहोत. वेळप्रसंगी जन आंदोलन देखील उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संचित कानकाटे, कार्याध्यक्ष गोपाल राठी, प्रदेश मंत्री विशाल वाकचौरे, जिल्हा मंत्री प्रशांत बेल्हेकर, कोषाध्यक्ष वाल्मिक धात्रक, तालुका संयोजक आशिष बेल्हेकर, गोरक्षा प्रमुख आशिष ओझा, उत्तर संयोजक आशुतोष भुजबळ, प्रसिद्धी प्रमुख रवी मंडलिक, जिल्हाध्यक्ष कुलदीप ठाकूर आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 100 Today: 2 Total: 1115292

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *