ग्रामसेवक संघटनेचे तहसीलदारांसह पोलिसांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच परिषदेमध्ये औरंगाबाद जिल्हा पश्चिम विभागाचे आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकाबद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त व्यक्तव्य केलेले आहे. याचा ग्रामसेवक संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन मंगळवारी (ता.9) अकोले तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.

पंचायतराज यंत्रणेमध्ये शेवटचा घटक म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दोन ते तीन पंचायतीचा कारभार ग्रामसेवक पाहत असून केंद्रापासून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्व विभागाचे कामकाज आज ग्रामसेवक करतात. तरी देखील आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. याचा महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवकांच्यावतीने निषेध करण्यात आला असून, त्यांनी तत्काळ बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदन देतेवेळी ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, वाळीबा मुंढे, सुभाष जाधव, वृषाली नवले, आशा दातीर, अविनाश मंडलिक, सुनील एरंडे, रामहरी भोर, सुधीर कोल्हे, दीपक माने, चांगदेव दरेकर, श्री.खाडे, श्री.आवारी आदी उपस्थित होते.
