‘हवाई रेमडेसिविर’ प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना निलंबित करा ः मापारी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
उच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवलेल्या बेकायदेशीर हवाई रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाला पाठिंबा देणार्‍या व अर्थपूर्ण घडामोडीत सहभागी असणार्‍या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बेकायदेशीर हवाई रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांची भूमिका अतिशय संशयास्पद असून, सामान्य माणसाला देखील यामध्ये संशय बळवलेला आहे. या प्रकरणी दाखल जनहित फौजदारी याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील वेगवेगळे गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. सदर बाब जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर संशय बळवणारी व ह्या प्रकरणाला पाठिशी घालणारी आहे., असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये रेमडेसिविरच्या इंजेक्शन उपचार अभावी अनेक रुग्णांनी देह ठेवला ठेवल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. तरी देखील राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी रेमडेसिविरचे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विमानतळावर उतरवले याची संपूर्ण कल्पना जिल्हाधिकार्‍यांना असताना देखील त्यांनी कुठल्या अधिकारात या संशयास्पद बाबींना पाठिंबा दिला. याची चौकशी करुन संबंधित जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी मापारी यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

Visits: 95 Today: 1 Total: 1108530

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *