आमदार तांबेंच्या निधीतून कॉटेज रुग्णालयास रुग्णवाहिका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाचे वाढते रुग्ण व त्यांच्यासाठी तातडीने आवश्यक असलेली रुग्णवाहिका याकरिता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी स्थानिक निधीतून कॉटेज हॉस्पिटलकरिता एक अद्ययावत रुग्णवाहिका दिली आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, कार्यकर्ते व स्वयंसेवक काम करत आहेत. तर संगमनेर शहरात नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागांमध्ये नगरसेवक व शासकीय कर्मचार्‍यांनी घरोघर जाऊन तपासणी करून कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तींना विलगीकरणात पाठवले. यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. दरम्यान, कॉटेल रुग्णालयाच्या मागणीनुसार आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी आपल्या स्थानिक निधीतून तातडीने रुग्णवाहिका दिली आहे. यामुळे संगमनेरमधील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. याबद्दल उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 71 Today: 1 Total: 1111182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *