दोघांच्या मृत्यूसह संगमनेर तालुक्यात आज आढळले उच्चांकी रुग्ण! जिल्ह्यातही आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या; दिवसभरात जिल्ह्यातील तेहतीस जणांचा बळी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही कोविड बाधितांच्या रुग्णसंख्येत कोणताही फरक पडला नसून आज जिल्ह्याने आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. संगमनेर तालुक्यातही आज समोर आलेल्या रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे, मात्र त्याचवेळी शहरी रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याने एकीकडे चिंता तर दुसरीकडे दिलासा अशी तालुक्याची स्थिती झाली आहे. आज तालुक्यातील पिंपळे व कौठे कमळेश्‍वर येथील दोघा ज्येष्ठ नागरिकांचा कोविडने मृत्यू झाला असून शहरातील 31 जणांसह तालुक्यातील 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 12 हजार 988 झाली आहे. सध्या तालुक्यात 1 हजार 699 सक्रीय रुग्ण असून आज दिवसभरात 276 जणांना घरी सोडण्यात आले आहे.


कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने देशातील बहुतेक राज्यांसह महाराष्ट्रातही कहर केला आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने व त्यातही गंभीर स्वरुपातील रुग्णांचा अधिक भरणा असल्याने राज्यासह जिल्ह्यात ऑक्सिजन व औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी खाटा, ऑक्सिजन व औषधे मिळवण्यासाठी शर्थ करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून ऑक्सिजन व औषधांच्या पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून रुग्णांना वाचवण्यासाठी यंत्रणेतील अनेक वरीष्ठ अधिकारी रात्रीचा दिवस करीत आहेत.


आज दिवसभरात संगमनेर तालुक्यातील पिंपळे व कोठे कमळेश्‍वर परिसरातील प्रत्येकी एका ज्येष्ठ नागरिकाचा आज कोविडने बळी घेतला. त्यासोबतच संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येने आज पुन्हा एकदा दोनशेचा टप्पा ओलांडला. मात्र आजच्या अहवालातून शुक्रवारी वाढलेली शहरीभागातील रुग्णसंख्या पुन्हा खाली आल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासाही मिळाला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 76, खासगी प्रयोगशाळेचे 70 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 71 अशा 217 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात शहरातील कॅ.लक्ष्मी चौकातील 24 वर्षीय महिला, गणेशनगरमधील 47 वर्षीय महिलेसह 41 वर्षीय तरुण, जूना जोर्वे रोड परिसरातील 75 वर्षीय महिला, जोर्वे रोड परिसरातील 44 वर्षीय इसम, माळीवाडा येथील 65 वर्षीय महिलेसह 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षीय मुलगा,


अकोले बायपास रस्त्यावरील 40 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 28 व 26 वर्षीय तरुण, ऑरेंज कॉर्नर येथील 84 वर्षीय वयोवृद्ध इसम, रम्यनगरीतील 56 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण व 43 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 42 व 41 वर्षीय तरुण व एक वर्षीय बालक, गोविंदनगर मधील 49 वर्षीय महिला व जनता नगरमधील 17 वर्षीय तरुण. तसेच ग्रामीणभागातील शिवापूर येथील 46 वर्षीय महिला व 36 वर्षीय तरुण, कनोली येथील 50 व 30 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण आणि 13 वर्षीय मुलगा, मनोली येथील 34 वर्षीय महिला, हंगेवाडीतील 24 वर्षीय तरुण, चवधरवाडीतील 47 वर्षीय महिला, ओझा बु. येथील 40 व 25 वर्षीय तरुणांसह 27 वर्षीय महिला, पिंप्री लौकीतील 70 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी, शेडगाव येथील 40 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला,


चणेगाव येथील 30 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 43 व 29 वर्षीय तरुण, देवगाव येथील 45 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 42 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 65, 46 व 25 वर्षीय महिला आणि 31 व 28 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 43 व 38 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगा, हिवरगाव पावसा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 24 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 49 वर्षीय इसमासह 40 व 39 वर्षीय महिला, 14 व 6 वर्षीय मुली व 10 वर्षीय मुलगा, सांगवी येथील 45 व 27 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, मोधळवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिरापूर येथील 21 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, झोळे येथील 60, 55, 42 व 36 वर्षीय महिलांसह 37 वर्षीय तरुण व 12 वर्षीय मुलगी,


बोरबन येथील 9 वर्षीय मुलगी, भोजदरी येथील 48 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, माळवाडीतील 34 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 60 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 50 व 47 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुण, सोनुशी येथील 41 वर्षीय महिला, निमोण येथील 55 व 52 वर्षीय महिला आणि 48 वर्षीय इसम, तिगांव येथील 20 वर्षीय तरुण, कौठे कमळेश्‍वर येथील 33 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिला, पोखरी हवेलीतील 30 वर्षीय तरुण, 30 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालक, पारेगाव येथील 48 वर्षीय इसम, आश्‍वी खुर्द येथील 59, 57 व 50 वर्षीय इसमांसह 35 व 25 वर्षीय तरुण आणि 44 वर्षीय महिला, दाढ बु. येथील 50 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, औरंगपूर येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माहुली येथील 55 व 25 वर्षीय महिलांसह 32 वर्षीय तरुण,


खंदरमाळ येथील 43 वर्षीय इसम, कुरकुंडी येथील 45 वर्षीय इसम, नांदूर येथील 20 वर्षीय तरुणी, डोळासणे येथील 48 वर्षीय महिला, जांबुत बु. येथील 53 वर्षीय महिला, माहेगाव हवेलीतील 47 व 30 वर्षीय महिलांसह 48 वर्षीय इसम, रणखांब येथील 37 व 35 वर्षीय तरुण, साकूर येथील 44 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, समनापूर येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय इसम, 38, 32 व 26 वर्षीय तरुण आणि 49, 42, 40, 35 व 33 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 50 वर्षीय इसम, सायखिंडीतील 48 वर्षीय महिला, दाढ खुर्दमधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 47 वर्षीय इसम आणि 34 व 26 वर्षीय तरुण, मालदाड येथील 38 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 38 वर्षीय तरुण आणि 38 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी व 11 वर्षीय मुलगी,


सुकेवाडीतील 47 वर्षीय इसम, घारगाव येथील 83 वर्षीय वयोवृद्धासह 23 व 20 वर्षीय तरुणी, 25 वर्षीय तरुण व 13 वर्षीय मुलगा, घुलेवाडीतील 64 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 45 व 43 वर्षीय इसम, 35, 27, 25, 24, 21, 19 व 18 वर्षीय दोघे तरुण व 16 आणि 15 वर्षांची मुले, 64, 51, 28 वर्षीय दोघी व 21 वर्षीय महिला, पावबाकीतील 19 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 31 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 22 वर्षीय तरुण, श्रीराम नगरमधील 51 वर्षीय इसम, बोटा येथील 38, 29 व 28 वर्षीय तरुण आणि 34 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 60, 48 व 32 वर्षीय महिला, जोर्वे येथील 49 वर्षीय इसमासह 48, 42 व 28 वर्षीय महिला,


पळसखेडे येथील 35 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 39 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम, 55, 35, 28, 24 व 22 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरुणी, ढोलेवाडीतील 29 व 26 वर्षीय महिला, निंभाळे येथील 52 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 58 वर्षीय महिला आणि अन्य ठिकाणच्या रुग्णांमध्ये राजूरी (श्रीरामपूर) येथील 45 वर्षीय इसम, दुर्गापूर येथील 47 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, चंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 217 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आज विक्रमी रुग्णांची नोंद, 33 जणांचे बळीही गेले!
जिल्ह्यात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णसंख्या समोर आली. शासकीय प्रयोगशाळेचे 861, खासगी प्रयोगशाळेचे 1 हजार 62 व रॅपीड अँटीजेनद्वारा प्राप्त झालेल्या 1 हजार 867 अशा एकूण 3 हजार 790 जणांना कोविडची लागण झाल्याचे आज समोर आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्र 887, नगर ग्रामीण 342, राहाता 302, कर्जत 293, अकोले 233, संगमनेर 217, राहुरी 216, श्रीरामपूर 200, भिंगार लष्करी परिसर 166, पारनेर 156, कोपरगाव 146, शेवगाव 121, नेवासा 120, श्रीगोंदा 109, इतर जिल्ह्यातील 108, पाथर्डी 107, जामखेड 55, लष्करी रुग्णालय 9 व इतर राज्यातील तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 52 हजार 236 झाली आहे. आज जिल्ह्यातील 33 जणांचा कोविडने बळी घेतला असून आजवर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1 हजार 721 झाली आहे. आज जिल्ह्यातील 3 हजार 23 जणांना उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 27 हजार 713 झाली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात 22 हजार 802 जणांवर उपचार सुरु आहेत.

Visits: 225 Today: 2 Total: 1420993

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *