संगमनेर शहराच्या रुग्णसंख्येला ब्रेक मात्र ग्रामीणभागात प्रादुर्भाव वाढलेलाच! रविवारी निमगाव जाळीतील तर आज शहरातील एकाचा कोविडने घेतला बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गती आजही टीकून असून आज जिल्ह्यात 1 हजार 998 रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या अहवालातून कर्जत व पाथर्डी तालुक्यात कोविडचा उद्रेक झाल्याचे समोर आले असून या दोन्ही तालुक्यातून तब्बल साडेतिनशेहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. यशिवाय आज नगर ग्रामीण, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर व शेवगाव या तालुक्यातून शंभरापेक्षा अधिक रुग्ण समोर आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 1 लाख 18 हजार 45 झाली आहे. आजच्या अहवालात संगमनेर तालुक्यातील 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या आता 10 हजार 154 झाली आहे. तर गेल्या बारा तासांत ग्रामीणभागातील एकासह दोघांचे बळीही गेले आहेत. तालुक्यात 1 हजार 225 सक्रीय रुग्ण असून आज 183 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत असून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही संक्रमणाच्या वेगात कोणताही बदल झाला नसल्याने चिंता निर्माण झाल्या आहेत. रोजच्या रुग्णवाढीने सक्रीय रुग्णांची संख्याही वाढल्याने तालुक्यातील रुग्णालयातील खाटा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला एकप्रकारे राज्य शासनाकडून ‘लॉकडाऊन’च्या घोषणेची प्रतिक्षा असल्याचेच चित्र सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात पहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यात 969 रुग्णावर उपचार होतील इतकी व्यवस्था असून लक्षणे नसलेल्या सुमारे दिड हजार रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र संस्थात्मक विलगीकरणात भरपूर खाटा शिल्लक असतांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व अतिदक्षता विभागातील खाटांची मात्र कमतरता निर्माण होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 9 अतिदक्षता आणि 33 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटाच उपलब्ध आहेत.

आजच्या अहवालातूनही जिल्ह्याचा कोविड आलेख आकाशाच्या दिशेने सरकणाराच असल्याचे समोर आले असून शासकीय प्रयोगशाळेच्या 657, खासगी प्रयोगशाळेच्या 337 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 4 अशा एकूण 1 हजार 998 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 382 रुग्णांचा समावेश आहे. त्यासोबतच कर्जत 222, नगर ग्रामीण 150, पाथर्डी 134, राहुरी 128, श्रीरामपूर 127, राहाता 124, संगमनेर 111, शेवगाव 105, पारनेर व श्रीगोंदा प्रत्येकी 86, अकोले व नेवासा प्रत्येकी 82, जामखेड 73, कोपरगाव 63, इतर जिल्ह्यातील 21, भिंगार लष्करी परिसरातील 19, इतर जिल्ह्यातील दोन व लष्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या काहीशी मर्यादीत स्वरुपात समोर येत असल्याने संगमनेरकरांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी अनेक रुग्ण आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय निवडण्याऐवजी एचआरटीसीचा (स्कॅनींग) पर्याय निवडत असून संक्रमण होवूनही नियंत्रित स्कोर असलेले अनेक रुग्ण आपल्या खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने परस्पर गृहविलगीकरणातच थांबत असल्याने कठोर निर्बंध लागू असतांनाही संक्रमणाच्या आकड्यांमध्ये फरक पडत नसल्याची चर्चा सुरु आहे. अशा रुग्णांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक बाब बनली असून लक्षणे नसलेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 67, खासगी प्रयोगशाळेचे 19 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा 21 अशा संगमनेर तालुक्यातील 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील अवघ्या आठ, ग्रामीण भागातील 94 तर अन्य तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. शहरातील देवीगल्लीतील 65 वर्षीय महिला, साईनाथ चौकातील 25 वर्षीय महिला, नायकवाडपूर्यातील 30 वर्षीय तरुण, राज कॉलनीतील 27 वर्षीय तरुण, विद्यानगरमधील 42 वर्षीय महिला आणि संगमनेर असा पत्ता असलेल्या 56 वर्षीय इसमासह 31 व 28 वर्षीय तरुणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या एकूण अहवालात पिंप्री निर्मळ (ता.राहाता) येथील 54 वर्षीय इसम, श्रीरामपूर येथील 48 वर्षीय इसम व गौतमनगर (कोपरगाव) येथील 12 व 11 वर्षीय मुलांसह आठ वर्षीय बालिकेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागातील संक्रमणाची गती वाढली असून आज तालुक्याच्या ग्रामीणक्षेत्रातील तब्बल 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कासारे येथील 58 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 55 वर्षीय महिला, खांबे येथील 48 वर्षीय महिलेसह आठ वर्षीय बालिका, खंदरमाळ येथील 30 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 33 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 55 वर्षीय इसमासह 48, 45 व 32 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 47 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 53 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 40 व 21 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मनोली येथील 25 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, हिवरगाव पावसा येथील 22 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 58 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, कौठे मलकापूर येथील 24 वर्षीय तरुण,

सावरगाव घुले येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 व 28 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 50 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 35 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 33 वर्षीय तरुण, डिग्रस येथील 34 व 20 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 36 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 11 वर्षीय महिला, दाढ खुर्दमधील 55 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 30 वर्षीय तरुण, वडगाव पानमधील 57 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, कोठे खुर्दमधील 40 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 55 वर्षीय इसमासह 40 व 36 वर्षीय तरुण व 41 वर्षीय दोघी आणि 20 वर्षीय महिला, मालदाड येथील 49 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 21 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 49 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण,

आश्वी बु. मधील 32 व 22 वर्षीय तरुणांसह 25 वर्षीय महिला, निंभाळे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय इसम, चिंचपूर येथील 37 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 27 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 38 व 24 वर्षीय महिला, धांदरफळ बु. मधील 50 वर्षीय इसमासह 32 वर्षीय महिला, खांडगावमधील 55 वर्षीय महिला, वैदुवाडीतील 29 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 80 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 58 व 45 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय तरुण, सांगवी येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळे येथील 57, 48, 29 व 24 वर्षीय महिलांसह 32, 31, 30 व 29 वर्षीय तरुण, पारेगाव येथील 40 वर्षीय तरुण, निमोणमधील 60, 52, 46 व 45 वर्षीय महिला व सोळा वर्षीय तरुण, कर्हे येथील 30 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, पळसखेडे येथील पाच वर्षीय बालिका व तीन वर्षीय बालक आणि खांजापूर येथील 45 व 38 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा आणि बारा व अकरा वर्षीय मुलींना कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 10 हजार 54 तर सक्रीय संक्रमितांची संख्या 1 हजार 225 झाली आहे. तालुक्यातील दोघांचे गेल्या बारा तासांत कोविडने बळी घेतले आहेत.

गेल्या अवघ्या बारा दिवसांच्या कालावधीतच जिल्ह्यात एकूण 23 हजार 139 रुग्णांची भर पडली आहे. त्यात सर्वाधीक 6 हजार 35 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रात आहेत. त्या खालोखाल राहाता 1 हजार 999, श्रीरामपूर 1 हजार 573, संगमनेर 1 हजार 500, नगर ग्रामीण 1 हजार 498, कोपरगाव 1 हजार 338, कर्जत 1 हजार 271, राहुरी 1 हजार 209, पाथर्डी 1 हजार 170, अकोले 1 हजार 102, शेवगाव 867, नेवासा 794, पारनेर 752, जामखेड 585 व श्रीगोंदा 510 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रोजची रुग्णवाढ आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढवणारी ठरत असून नागरिकांनी नियमांचे सक्तिने पालन करण्याची गरज आहे.

