पिंप्री लौकी-आजमपूर शिवारातील रोहित्र आगीत जळाले

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी-आजमपूर शिवारात रविवारी (ता.11) सायंकाळी विद्युत रोहित्र जळून खाक झाले आहे. मात्र, लगत असलेले कुक्कुटपालन शेड थोडक्यात बचावली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंप्री लौकी-आजमपूर शिवारात शरद आप्पाजी दराडी यांच्या शेतात विद्युत रोहित्र आहे. रविवारी सायंकाळी अचानक या रोहित्राने पेट घेतला. उन्हाचा कडाका असल्याने क्षणार्धात आगीने रुद्रावतार धारण केला. त्यामुळे आगीचे प्रचंड मोठे लोळ निघून काही वेळातच विद्युत रोहित्र जळून खाक झाले. दरम्यान, लगतच डॉ.पप्पू दराडी यांचे 10 हजार पक्षी असलेली कुक्कुटपालन शेड थोडक्यात बचावली आहे. या आगीत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसली तरी विद्युत रोहित्र जळाल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 80396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *