कोंबड्यांची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप पलटी

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथे कोंबड्याची पिल्ले घेवून जाणारी पिकअप पलटी झाली. हा अपघात शनिवारी (ता.10) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झाला. यामध्ये अनेक पिल्लांचा मृत्यू झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे येथून कोंबड्यांची पिल्ले घेऊन पिकअप (क्र.एमएच.12, क्यूडब्ल्यू.9740) संगमनेरच्या दिशेने येत होता. दरम्यान, गुंजाळवाडी पठार शिवारात आला असता महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला असून महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले मोठ्या प्रमाणात पडली होती. तर अनेक पिल्लांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन टोलनाक्याच्या क्रेनने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Visits: 167 Today: 1 Total: 1868867

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *