साकुरी येथील विवाहितेची आत्महत्या
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील साकुरी येथील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन आणि जागा घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावे. यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने गुरुवारी (ता.8) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

याबाबत राहाता पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकुरी येथील साईपार्क हौसिंग सोसायटील येथील अश्विनी मुकुंद कोते (वय 30) ही विवाहिता सासरी नांदत असताना नवरा मुकुंद कोते व रेखा कोते यांनी सतत चारित्र्यावर संशय घेऊन आणि जागा घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. यामुळे सतत होणार्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागून अखेर गुरुवारी राहात्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी राहुल पोपट गुंजाळ (रा.रायपूर, ता.चांदवड, जि.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुरनं. 71/2021 भा.दं.वि. कलम 306, 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पगारे हे करत आहे.
