संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी आरिफ देशमुख

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आरिफ देशमुख यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, काँग्रेस गटनेते दिलीप पुंड, पक्षप्रतोद विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, डॉ. दानिश खान, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग यांच्यासह सर्व नगरसेवक ऑनलाईन उपस्थित होते. सदर निवडीनंतर देशमुख यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना नूतन उपनगराध्यक्ष देशमुख म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता शहरातील नागरिकांसाठी अद्ययावत सुविधा, मुबलक व स्वच्छ पाणी, रस्ते आणि हरित शहर निर्मितीसाठी सर्वतोपरी काम करणार असल्याचे सांगितले. पीठासीन अधिकारी डॉ. मंगरुळे यांना मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आदिंनी सहकार्य केले.

Visits: 155 Today: 1 Total: 1873173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *