दूधगंगा पतसंस्थेस सव्वा कोटीचा नफा ः कुटे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
31 मार्च, 2021 अखेर मुख्य कार्यालयासह पाच शाखांचा मिळून व्यापारी नफा 3 कोटी 3 लाख झाला असून, इतर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 1 कोटी 24 लाख 73 हजार रुपये झाला आहे. विशेष म्हणजे सर्व शाखांची कामगिरी अतिशय उत्तम राहिली असून, कोरोनातही सर्वसामान्यांसह शेतकरी, व्यापारी अतिशय अडचणीत असताना संचालक व कर्मचार्यांनी स्वतःला झोकून देत काटकसरीने काम केले. तसेच कर्जदारांना विश्वासात घेऊन वसुलीवर भर दिल्यानेच संस्थेला नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी दिली.

सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरातांनी सहकाराला घालून दिलेल्या शिस्तीनुसार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या भक्कम साथीमुळे, आमदार डॉ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर व लक्ष्मण कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 वर्षांपासून संस्था अविरतपणे चालू आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह बाजार समिती, वडगाव पान, तळेगाव, धांदरफळ व मेनरोड संगमनेर अशा पाच शाखा कार्यरत आहे. या संपूर्ण वर्षात कोरोनामुळे सर्व क्षेत्र कोलमडलेले असताना संस्थेने प्रगतीचा अहवाल कायम राखत निधी 17 कोटी 19 लाख 41 हजार, ठेवी 138 कोटी 63 लाख 31 हजार, कर्ज वाटप 104 कोटी 82 लाख 55 हजार, गुंतवणूक 53 कोटी 10 लाख 47 हजार, कायम मालमत्ता 3 कोटी, 35 लाख 64 हजार याप्रमाणे असून 1 कोटी 24 लाख 73 हजार रुपयांच्या नफ्यासह ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे. या वाटचालीत उपाध्यक्ष अशोक सातपुते, संचालक नवनाथ अरगडे, रामनाथ कुर्हे, भास्कर शेरमाळे, भास्कर पानसरे, राजेंद्र रहाणे, भागवत गुंजाळ, रघुनाथ कुटे, देवेंद्र काळे, सुनील गुंजाळ, निवृत्ती सातपुते, नदीम शेख, मुक्ता पवार, मंगल सातपुते, भाऊसाहेब खरात, जयंत गुंजाळ, कैलास घोडेकर, संजय गुंजाळ, सहव्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांसह कर्मचार्यांचे योगदान असल्याचे संस्थापक अध्यक्ष कुटे यांनी शेवटी नमूद केले.
