सर्वोदय पतसंस्थेला सव्वा चार कोटींचा नफा ः शाह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात एनपीए तरतूद पूर्व 4 कोटी 24 लाखांचा नफा झाला असून, एनपीएची 1 कोटी 45 लाखांची तरतूद करुन 2 कोटी 79 लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन शाह यांनी दिली आहे.

सर्वोदय पतसंस्थेच्या आर्थिक वर्षात ठेवी 153 कोटी 41 लाख असून संस्थेचे कर्ज वाटप 116 कोटी 40 लाख इतके आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल 210 कोटी 28 लाख आहे. तसेच संस्थेचा स्वनिधी 50 कोटी 68 लाख तर गंतवणूक 84 कोटी 24 लाख इतकी आहे. सन 2020-21 वर्ष कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला धोक्याचे ठरले आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे, कर्ज थकबाकी वसूल करणे फार जिकिरीचे ठरले आहे. सर्वत्र टाळेबंदी असल्याने छोटे-मोठे उद्योगधंदे ठप्प झाले, अशाही परिस्थितीत संस्था ठेवी व कर्जाचे सुनियोजित व्यवस्थापन करुन आलेख उंचावत ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. कर्ज थकबाकीमुळे संस्थेला एनपीए तरतूद करावी लागली. अशा कठीण स्थितीतही संस्थेवर ठेवीदार, कर्जदार यांनी विश्वास दाखविल्याबद्दल उपाध्यक्ष महेश कटारिया यांनी आभार मानले आहे. याप्रसंगी संस्थेचे संचालक शैलेंद्र ओहरा, सचिन बी. शाह, कल्पेश मेहता, सुरेश शाह, दर्शन मेहता, सुभाषचंद्र शाह, वैभव शाह, शरद ओहरा, संकेत शाह, श्वेता मेहता, राखी शाह, अरुण नारायणे, नितीन भागवत, राजेंद्र काळे, राजेश दोशी, आशिष शाह, व्यवस्थापक मधुकर वनम उपस्थित होते.

Visits: 229 Today: 2 Total: 2298422

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *