केलवड येथील शेतकर्‍याची पाईपमध्ये फसवणूक

नायक वृत्तसेवा, राहाता
नामांकित कंपनीचे शेतीसाठी पाईपलाईन करण्यासाठी लागणारे पाईप असल्याचे भासवून शेतकर्‍याची फसवणूक झाली असल्याचा प्रकार नुकताच राहाता तालुक्यातील केलवड येथे समोर आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केलवड येथील शेतकरी सोनवणे यांनी आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी राहात्यातील एका व्यापार्‍याकडून आयएसआय मार्कचे सुपर गरवारे या कंपनीचे पीव्हीसी 50 नग पाईप 16 डिसेंबर, 2020 रोजी खरेदी केले होते. सदर शेतीमध्ये पाईपलाईन करण्यासाठी सोनवणे या शेतकर्‍याने आपल्या पत्नीचे सोने बँकेमध्ये गहाण ठेवून संबंधित व्यापार्‍याकडून पाईपची खरेदी केली होती. परंतु सदर पाईप जेसीबीद्वारे शेतात खोदून पाईपलाईन टाकून झाल्यानंतर लगेचच 8 दिवसांत हे मधोमध चिरले गेले. याबाबत शेतकर्‍याने संबंधित व्यापार्‍याला विचारणा केली असता व्यापार्‍याने शेतकर्‍याला उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय पाईपचे पक्के बील देण्यासही नकार दिला. यानंतर शेतकर्‍याने कृषीमंत्री दादा भुसे यांना लेखी अर्ज करून माझी फसवणूक झाल्याबाबत अर्ज दाखल केला. यावर कृषीमंत्री भुसे यांनी संबंधित फसवणूक झालेल्या प्रकरणाची दाखल घेवून राहाता तालुका कृषी अधिकार्‍यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *