पद्मावती हिरोमध्ये डिसेंबरमध्ये ट्रिपल महाधमाका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदाच्या वर्ष अखेरीस हिरो मोटोकॉर्प आणि पद्मावती हिरो यांनी ‘घ्या गाडी जिंका गाडी’ ही आकर्षक योजना आणली आहे. यामध्ये डिसेंबर महिन्यात पद्मावती हिरोमधून गाडी खरेदी करणार्‍या ग्राहकांमधून एकास हिरोची नवी कोरी गाडी लकी ड्रॉमध्ये जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. सोबत प्रत्येक ग्राहकाला मोटारसायकल किंवा स्कूटर खरेदीवर एक हजार रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सेसरीज् (सीट कव्हर, ग्रीप कव्हर, इंडिकेटर बझर, इंजिन गार्ड, ब्रेक पॅडल रबर, साइड हूक, पॉलिशची बॉटल, रुमाल) फ्री देण्यात येणार आहेत. दुचाकींच्या किंमती 1 जानेवारीपासून वाढणार असल्याने डिसेंबर महिन्यातच गाडी खरेदी करणे, म्हणजे तिहेरी लाभ मिळविण्याची सुवर्णसंधी असल्याचे पद्मावती हिरोचे संचालक सुमित मणियार यांनी सांगितले.

हिरोच्या एक्सट्रिम 160 आर, 200 एसएक्स पल्स 200, 200 टी यापैकी कोणतीही गाडी दि. 31 डिसेंबरपर्यंत खरेदी केल्यास ग्राहकांना पाच हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळणार आहे. ‘हिरो स्कूटर कार्निव्हल’मध्ये 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत हिरोची कोणतीही स्कूटर खरेदी करणार्‍यांना पाच हजार रुपयांचा एक्सचेंज/लॉयल्टी बोनस मिळणार आहे. म्हणजेच कोणत्याही कंपनीची जुनी गाडी देऊन वरीलपैकी कोणतीही गाडी (प्रीमियम स्कूटर) खरेदी करणार्‍यांना आणि ज्यांच्या घरांमध्ये हिरो किंवा हिरो होंडाची गाडी आहे आणि ते ग्राहक आपल्या घरांमध्ये हिरोची आणखी एक मोटारसायकल किंवा स्कूटर खरेदी करतील त्यांना पाच हजार रुपयांचा फायदा होणार आहे. विक्री व विक्रीपश्चात सेवेमध्ये पद्मावती हिरोने नेहमीच ग्राहकांचे हित लक्षात घेऊन याआधी अनेक योजना राबवल्या आहेत. हिरोच्या सर्व मोटारसायकली व स्कूटर्स सर्व रंगांमध्ये, हजर स्टॉकमध्ये आहेत. शिवाय गाडी खरेदीसाठी हिरो फिनकॉर्प, एचडीएफसी बँक, श्रीराम सिटी फायनान्स, इंडस इंड बँक, एल अँड टी, टाटा कॅपिटल, चोला मंडलम, आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे 90 टक्क्यांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. झिरो डाऊन पेमेंट, शून्य टक्के व्याजदर या स्कीममध्ये हिरोची कोणतीही गाडी खरेदी करुन या खरेदीवर गाडी जिंकण्याची संधी ग्राहकांनी साधावी असे आवाहन पद्मावती हिरोतर्फे करण्यात आले आहे.

Visits: 137 Today: 3 Total: 1111116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *