रविवारी श्रीरामपूर बंदची हाक…

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा दुसरीकडे बसविण्यात येणार असल्याच्या नगराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात आणि शहरातील श्री शिवाजी चौकातच पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता.4) श्रीरामपूर बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरातील शिवाजी चौकात महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा बसवावा ही लोकभावना वाढू लागल्याने या मागणीला छेद देत नगराध्यक्षांनी हा पुतळा दुसरीकडे बसविण्याचा घाट घातला आहे. हा श्रीरामपूरकरांच्या लोकभावनेचा अपमान आहे. असे काही नगराध्यक्षांनी प्रयत्न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटून पालिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्याचबरोबर शिवजयंतीच्या दिवशी काही शिवप्रेमींनी छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा स्थापन केला होता. मात्र, पालिकेने अत्यंत तातडीने अपमानास्पद पद्धतीने तेथून हलविला. हे कृत्य हिटलरशाहीला लाजविणारे असल्याची संतप्त भावना अनेक शिवप्रेमींसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही गोष्टींच्या निषेधार्थ श्री शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्यावतीने रविवारी श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1112822

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *