वांबोरी परिसरात पुलावरुन पडून तरुणाचा मृत्यू

वांबोरी परिसरात पुलावरुन पडून तरुणाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी येथील मोरवाडी ते इनामदार वस्तीकडे जाणार्‍या करपरा नदीच्या पुलावरुन मंगळवारी (ता.22) एक तरुण खाली पडल्याने प्रवाहात वाहून गेला होता. अखेर दुसर्‍या दिवशी बुधवारी (ता.23) त्याचा मृतदेह बंधार्‍यामध्ये आढळून आला.


याबाबतची अधिक माहिती अशी की, दुर्गा मारुती लोखंडे (वय 35) हा तरूण मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भंगार आणण्यासाठी वांबोरीहून मोरवाडी इनामदार वस्तीकडे चालला होता. दरम्यान, चिंचेचा मळा ते इनामदार वस्तीकडे जाण्यासाठी मध्ये करपरा नदी आहे. या नदीवर पूल असून, तो तो पाऊस नसतानाही पलीकडे गेला. परंतु येथील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुर्गा लोखंडे हा भंगार न घेताच परतत असताना पुलावरुन अंदाज चुकल्यामुळे मोटारसायकल (क्रमांक एमएच.17, एडी.2855 हिरो होंडा) सह तो खाली पडला. पाणी असल्याने तो वाहत गेला. रात्रभर त्याचा शोध घेतला; परंतु त्याचा तपास लागला नाही. अखेर बुधवारी 11 वाजण्याच्या त्याचा मृतदेह बंधार्‍याच्या डबक्यामध्ये आढळून आला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 71 Today: 1 Total: 436339

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *