विश्व हायटेक नर्सरीकडून प्रगतिशील शेतकर्‍यांचा सन्मान

नायक वृत्तसेवा, अकोले
संगमनेर तालुक्याची कामधेनू असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकर्‍यांचा नुकताच खांडगाव येथे विश्व हायटेक नर्सरीकडून यथोचित सन्मान करण्यात आला.

नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस, झेंडू यांसह भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधलेल्या संगमनेर तालुक्यातील निमज व खांडगाव येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकर्‍यांना नुकतेच सहकारमहर्षी थोरात कारखान्याकडून पुरस्कार देण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध झेंडू उत्पादक तुकाराम गुंजाळ, ऊस उत्पादक रवींद्र भोकनळ, शिवाजी गुंजाळ, शिवाजी वर्पे, भाजीपाला उत्पादक लक्ष्मण गुंजाळ, कपिल गुंजाळ, संदीप गुंजाळ यांचा सहभाग होता. त्यांचा विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी यथोचित सन्मान करत पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानू गुंजाळ, थोरात कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, नर्सरीचे व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विपणन प्रतिनिधी वैभव भारती आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Visits: 162 Today: 1 Total: 1869289

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *