श्रीरामपूर तालुक्यात महावितरण अधिकारी व शेतकर्‍यांत गोंधळ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कृषीपंपाच्या वीज पुरवठ्याबाबत सरकारने नवीन धोरणाची मोबाईलवर पाठविलेली माहिती सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलीच नाही. अनेक शेतकरी अर्धशिक्षित असल्याने मोबाईल आलेली माहिती व्यवस्थितरित्या समजली नसल्याने महावितरण अधिकारी व शेतकर्‍यांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र श्रीरामपूर तालुक्यात पहायला मिळत आहे.

महावितरणने कृषीपंपांची वीज खंडीत केल्या पाण्याअभावी जनावरे दगावण्याची शक्यता आहे. त्यास महावितरणचे अधिकारी जबाबदारी राहतील, असा इशारा बाबासाहेब आरसुले यांनी दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, तहसीलदार प्रशांत पाटील, महावितरण उपअभियंत्यांना दिले आहे. तसेच तालुक्यातील भेर्डापूर बसस्थानक ते अशोक कारखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी देखील आरसुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी संतोष शेवाळे यांना निवेदन दिले. आरसुले यांनी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भासले, तहसीलदार प्रशांत पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे यांनाही दिल्या आहेत.

Visits: 234 Today: 1 Total: 2167803

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *