नेवाशामध्ये 110 किलो गोमांस जप्त

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातील खाटिक गल्लीत नुकताच छापा टाकून पोलिसांनी 110 किलो वजनाचे गोमांस जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत नेवासा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील खाटिक गल्लीत स्वीफ्ट कारमधून (क्र.एमएच.17, एजे.7279) 110 किलो वजनाचे गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला. या प्रकरणी पोलीस शिपाई अंकुश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुजाहिद गुलाब चौधरी व सिद्दीक गनी चौधरी (दोघेही रा.नेवासा खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Visits: 76 Today: 2 Total: 1107069
