आठ सहयोगी प्राध्यापकांची प्रोफेसर पदावर पदोन्नती
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीच्या पदासाठी संपन्न झालेली विषयतज्ज्ञ व निवड समितीसमोरील मुलाखत व कुलगुरु यांनी मान्य केलेला प्राध्यापक निवड समितीचा अहवाल यानुसार संगमनेर महाविद्यालयातील तब्बल आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार व डॉ.उमेश जगदाळे, मराठी विभागातील विभागप्रमुख डॉ.अशोक लिंबेकर व डॉ.राहुल हांडे, अर्थशास्त्र विभागातील डॉ.गोरक्षनाथ सानप, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुवर्णा बेनके, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.वंदना भवरे तसेच ग्रंथालय शास्त्र विभागातील ग्रंथपाल डॉ.बबन चव्हाण यांचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या नियमानुसार सदर सहयोगी प्राध्यापक पीएच. डी. असणे व शोधपत्रिकेचे दहा लेख प्रकाशित होणे आवश्यक असते. या सर्व नियमांमध्ये पात्र झाल्यानंतर निवड समितीने महाविद्यालयातील आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसर पदावर पदोन्नती दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनी दिली. याबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहालीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए.नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी, व्यवस्थापनातील अन्य सदस्य, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लढ्ढा, शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी अभिनंदन केले आहे.