संतांचे विचार आणि कार्य वैश्विक ः आ.डॉ.तांबे
संतांचे विचार आणि कार्य वैश्विक ः आ.डॉ.तांबे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘हे विश्वची माझे घर’ मानून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानपीठ निर्माण करणारे संत ज्ञानेश्वर माऊली व भावंडांचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील आद्य राष्ट्रसंत भोजलिंग महाराजांचा भावंडांना घडविण्यामध्ये व संस्कारीत करण्यात मोलाचा वाटा आहे. यावरुनच संतांचे विचार आणि कार्य वैश्विक असल्याचा प्रत्यय येतो, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
सत्यशोधक समितीने निर्माण केलेल्या राष्ट्रसंत भोजलिंग महाराज (काका) यांच्या सुधारित तैलचित्राचे अनावरण प्रसंगी तेे बोलत होते. तत्पूर्वी तैलचित्राचे अनावरण बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ समाज संघटक भास्कर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजिंक्य डी. वाय. पाटील कॅम्पसचे रजिस्ट्रार विद्यानंद मानकर, विश्वकर्मावंशीय समाज संघटक संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा.नागोराव पांचाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू गरुड, कार्याध्यक्ष दिलीप दीक्षित, सचिव संजय बोराडे, संघटक अरुण भालेकर, विलास सूर्यवंशी, संजय भालेराव, अनिल सोमवंशी, शरद बोरसे, जिल्हा परिषद सदस्य आर.एम.कातोरे, मिलिंद कानवडे, पी.जी.सुतार, बिपीन सुतार, संजय बोरुडे, समीर भालेकर, प्रमोद दिवेकर, गजानन जवरकर, सुरेश भालेराव, रवींद्र रायकर, विनायक सुतार, दिलीप आनंदे, संतोष कदम, वीरेंद्र भालेराव, एन.टी.कदम, बाळासाहेब वाकचौरे, नायब तहसीलदार राजगुरु, राजेंद्र कदम, रूपेश भालेराव, महेश सूर्यवंशी, कचेश्वर सोनवणे, ऋषीकेश राऊत, संपत वाकचौरे, विठ्ठल जानेकर, चंद्रकांत कदम, बबन कदम, ज्ञानेश्वर राक्षे, कारभारी देव्हारे, राजू शेख, राजेंद्र गाडेकर, केशव सोमवंशी, ओबीसी ब्रिगेड व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी अकोले येथील आदिवासी भागातील उर्दू प्राथमिक शाळेला स्मार्ट टीव्ही रवींद्र रायकर, बाळासाहेब गराडे यांच्यावतीने भेट देण्यात आला.