जयंती महोत्सवानिमित्त युवा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आयोजकांचे आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (ता.25) यशोधन प्रांगण (शेतकरी संघ शेजारी) येथे तालुकास्तरीय युवा जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आचार्य बाबुराव गवांदे यांनी दिली.

संगमनेरतालुक्याच्या विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची मोलाची भूमिका राहिली असून त्यांनी सहकार, शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्याचबरोबर हरित क्रांतीचे प्रेणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनीही कृषीमंत्रीपदाच्या काळात महान कार्य केले. या दोन्ही महापुरुषांचे कार्य सतत तरुण पिढीला प्रेरणा देणारे असून त्यांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. 25 सप्टेंबरला होणार्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विविध गुणदर्शक कार्यक्रमांमध्ये आदिवासी नृत्य, भांगडा नृत्य, देशभक्तीपर गीते, चित्रपट गीते, नाविण्यपूर्ण गीते, पोवाडा, लावणी नृत्य, कव्वाली, एकपात्री प्रयोग, नाट्य छटा आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

तरी वरीलप्रमाणे नमूद केलेला एक कार्यक्रम निवडून त्याची पूर्ण तयारी करुन कार्यक्रमाची रुपरेषा, आवश्यक कालावधी याबाबतची माहिती सह्याद्री शिक्षण संस्थेच्या 19 सप्टेंबरपूर्वी कार्यालयात सादर करावी. नाव नोंदणी करताना शाखेचे नाव, दूरध्वनी क्रमांक, मुख्याध्यापकांचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, कार्यक्रमाचे नाव व प्रकार, लागणारा कालावधी, सहभागी कलाकारांची संख्या व नावे, मार्गदर्शक शिक्षकाचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक आदी माहिती देणे आवश्यक आहे. तालुका पथकामार्फत शाखेतील विविध गुणदर्शन कार्यक्रमांची पाहणी 20 सप्टेंबर 2022 ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीत करण्यात येईल. सहभाग नोंदविण्यासाठी सह्याद्रीचे रजिस्ट्रार बी. आर. गवांदे (9422331470 / 9822965538), एस. सी. आहेर (8600135100) यांच्याशी संपर्क साधावा.
