राजहंस दूध संघाची रविवारी वार्षिक सभा तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सभा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजहंस दूध संघाची सन 2019-2020 ची अधिमंडळाची 43 वी वार्षिक बैठक रविवार दिनांक 21 मार्च, 2021 रोजी दुपारी 3 वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी दिली आहे.

तसेच शनिवारी (ता.20) सकाळी 11 वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष अमित पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सभा ऑनलाईन होणार आहेत. या सभेसाठी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. तरी राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सर्व सभासद, दूध उत्पादक व शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, दत्तात्रय खुळे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.प्रताप उबाळे, रमेश थोरात व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Visits: 195 Today: 1 Total: 2125816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *