अवघ्या चोवीस तासात जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत नऊशे बाधितांची भर! संगमनेर तालुक्यातील सरासरीही वाढलेली; चोवीस तासात वाढले तब्बल नव्यान्नव रुग्ण..
नायक वृत्तसेवा संगमनेर
जिल्ह्यातील कोविडस्थिती दिवसों दिवस अवघड होत चालली आहे. गेल्या 24 तासातच जिल्ह्यात तब्बल 901 रुग्णांची भर पडली असून त्यात अहमदनगर तालुक्यातील 305, राहता तालुक्यातील 117 तर संगमनेर तालुक्यातील 99 रुग्णांचा समावेश आहे. नव्याने सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणात आता शहरातील व्यापारी वर्गालाही लागण व्हायला सुरुवात झाली असून आजही शहरातील काही व्यापाऱ्यांसह तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 53 रुग्णांची तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 449 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता सात हजार 365 वर पोहोचली आहे. त्यातील 281 रुग्ण सक्रिय संक्रमित आहेत. तालुक्यातील अठरा जणांनी उपचार पूर्ण केल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या एक मार्चपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने पुन्हा वेग घेतला असून जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यातील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांचा विचार करता जिल्ह्यात एकूण 901 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात अहमदनगर तालुक्यात 305, राहता तालुक्यात 117, संगमनेर तालुक्यात 99, कोपरगाव तालुक्यात 76, श्रीरामपूर तालुक्यात 61 तर पारनेर तालुक्यात 51 रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण बाधीत संख्या आता 80 हजार 429 वर पोहोचली आहे. त्यातील 77 हजार 30 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.77 टक्के इतके आहे. आत्तापर्यंत कोविडने जिल्ह्यातील 1 हजार 172 जणांचे बळी घेतले आहेत. या साखळीत आजही जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत 449 रुग्णांची भर पडली. तर 325 रुग्णांनी उपचार पूर्ण केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
संगमनेर तालुक्यात आज पुन्हा एकदा 50 पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील 22 व ग्रामीण क्षेत्रातील 31 अशा एकूण 53 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. शनिवारी उशिराने प्राप्त झालेल्या अहवालातून एकूण 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यात शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 31 जणांचा समावेश होता. गेल्या अवघ्या 24 तासांतच संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 99 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील बाधितांची सरासरीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
आज (ता.14) प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या सुयोग सोसायटीतील 46 वर्षीय इसम, नवीन नगर रस्त्यावरील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम व 56 वर्षीय महिला. ज्ञानेश्वर गल्लीतील 29 वर्षीय तरुण. स्वातंत्र्य चौकातील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. प्लॅटिनम कॉलनीतील 51 वर्षीय इसम, अभिनव नगर मधील चाळीस वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी, मालदाड रोड परिसरातील 27 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला, क्रांती चौकातील 39 वर्षीय तरुण, बी.एड कॉलेज परिसरातील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक.
साळीवाडा परिसरातील 59 वर्षीय व्यापारी, स्वामी समर्थ नगर मधील 17 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 27 वर्षीय महिला, गणेशनगर परिसरातील 35 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला व अकरा वर्षीय मुलगी. जनतानगर मधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 48 वर्षीय महिलेसह सात वर्षीय मुलाला कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील रायतेवाडी येथील 37 वर्षीय तरुण. आंबी खालसा येथील 40 वर्षीय तरुण. पोखरी बाळेश्वर येथील 28 वर्षीय तरुण. निमगाव जाळी येथील 88 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. डिग्रस मालुंंजे येथील 45 वर्षीय इसम. चिखली येथील 35 वर्षीय तरुण.
राजापूर येथील 80 व 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. धांदरफळ येथील अकरा वर्षीय मुलगा. घारगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 26 वर्षीय तरुण आणि तेरा व बारा वर्षीय मुले. गुंजाळवाडी येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय महिला. चिंचोली गुरव येथील 73 वर्षीय महिला. सुकेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. घुलेवाडी परिसरातील आशीर्वाद कॉलनीतील 25 व 21 वर्षीय तरुण, मालपाणी नगर परिसरातील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय तरुण व 38 वर्षीय महिला. नान्नज दुमाला येथील 41 वर्षीय महिला. गणोरे येथील 69 वर्षीय महिला. जवळे कडलग येथील 70 व 24 वर्षीय महिला. मंगळापुर येथील 23 वर्षीय तरुण. पिंपरणे येथील 31 वर्षीय तरुण. पळसखेड येथील सहा वर्षीय बालक आणि आश्वी पोलीस ठाण्यातील 38 वर्षीय पोलीस कर्मचारी असे तालुक्यातील एकूण 53 जण बाधित झाले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याचा कोविड आलेख आजही उंचावत तब्बल 7 हजार 365 वर जाऊन पोहोचला आहे.
फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने पुन्हा एकदा गती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातही जिल्ह्यात अहमदनगर, संगमनेर, राहाता व कोपरगाव या चार तालुक्यात कोविड प्रादुर्भावाची गती अधिक असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारीत जिल्ह्यात सरासरी दररोज शंभर रुग्ण समोर येत होते. आजच्या स्थितीत हीच संख्या तब्बल साडेचारशेवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडची स्थिती अवघड होत असल्याचे दिसत असून जिल्ह्याचा प्रवास पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर पाठोपाठ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या संगमनेर व राहाता तालुक्यात आढळून येत आहे. गेल्या चोवीस तासात संगमनेर तालुक्यात शनिवारी (ता.13) 46 तर आज (ता.14) 53 अशा एकूण 99 रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील 37 तर ग्रामीण भागातील 62 रुग्णांचा समावेश आहे. संक्रमण सुरु झाल्यापासून आजवर संगमनेर तालुक्यात एकूण 7 हजार 365 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील 2 हजार 156 तर ग्रामीण भागातील 5 हजार 156 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 58 जणांचे कोविडने बळी घेतले असून 7 हजार 2 जणांनी उपचार पूर्ण केले आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यातील 281 रुग्ण सक्रिय संक्रमित आहेत.
Visits: 20 Today: 2 Total: 115234